विहिरीत बुडून 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू,अंदाज चुकला अन् विपरित घडलं!

21-Year-Old Youth Drowns in Well : रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील रामवाडी गावात विहिरीत बुडून एका २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. मित्रांसोबत पोहत असताना पाण्याचा अंदाज चुकल्याने ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे.
21-Year-Old Youth Drowns in Well
21-Year-Old Youth Drowns in Well
Published On
Summary
  • रामवाडी येथे २१ वर्षीय तरुणाचा विहिरीत बुडून मृत्यू.

  • विघ्नेश तेलंगे मित्रांसोबत पोहण्यासाठी गेला असताना दुर्घटना घडली.

  • पाण्याचा अंदाज चुकल्याने तो विहिरीत बुडाल्याची प्राथमिक माहिती.

रायगडमधील सुधागड तालुक्यात असलेल्या रामवाडीमध्ये एका २१ वर्षीय तरुणाचा विहिरीत बुडून मृत्यू झालाय. यामुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. रासळ ग्रामपंचायत हद्दीतील रामवाडी ही दुर्घटना घडलीय. विघ्नेश सुरेश तेलंगे, वय २१ वर्षे, राहणार रामवाडी, असे मृत तरुणाचे नाव आहे.

21-Year-Old Youth Drowns in Well
शाळेच्या सहलीला गेले, ५५-६० विद्यार्थ्यांना विषबाधा; ठाण्यातील घटनेने खळबळ, पालकांमध्ये भीती

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार विघ्नेश त्याच्या चार मित्रांसोबत रामवाडी या आपल्या गावी आला होता. त्यावेळी ते गावाजवळील एका विहिरीवर पोहण्यासाठी गेले होते. तिथे पाण्याचा अंदाज न आल्याने विघ्नेशचा विहिरीत बुडून मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पाली पोलीस ठाण्याचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. विहिरीचा खोलपणा आणि सध्या चालू असलेल्या पावसामुळे विहिरीतील पाणी गढूळ होते. यामुळे स्थानिक लोकांना विघ्नेशचा शोध घेणं कठीण होत होतं.

परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता प्रशासनाने कोलाड येथील आपत्कालीन रेस्क्यू टीमला पाचारण केलं. कोलाडहून आलेल्या रेस्क्यू टीमने घटनास्थळी पोहोचताच युद्धपातळीवर शोधमोहीम राबवली. गढूळ पाण्यामुळे आणि विहिरीच्या खोलीमुळे अडचणी येत असतानाही रेस्क्यू टीमने विघ्नेशचा मृतदेह शोधून विहिरीबाहेर काढला. या दुर्घटनेची नोंद पाली पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. घटनेचा पुढील तपास पाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उत्तम रिकामे यांच्या मार्गदर्शनाखाली केला जातोय. विघ्नेशच्या मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबासह संपूर्ण रामवाडी गावावर शोककळा पसरली आहे.

21-Year-Old Youth Drowns in Well
Maharashtra rain: राज्यात मान्सूनला मोठा ब्रेक; 'या' कारणामुळे गायब झाले ढग, हवामान खात्याचा नवीन अंदाज काय?

नालासोपाऱ्यात साचलेल्या पाण्यात बुडून १३ वर्षीय मुलाचा मृत्यू

लासोपारा येथे साचलेल्या पाण्यात बुडून एका १३ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. नमन केसरवाणी (वय १३, रा. जयअंबे चाळ, वलईपाडा, नालासोपारा पूर्व) असे मृत मुलाचे नाव आहे. नमन आपल्या मित्रांसोबत बाहेर फिरण्यासाठी गेला होता. नालासोपारा पूर्वेतील गरळपाडा परिसरातील एका मोठ्या मैदानात पावसाचे मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com