पावसाळी पर्यटनाचा प्लॅन करताय? तर मग थांबा; 'या' प्रसिद्ध ४ ठिकाणांवर प्रशासनाचे कडक निर्बंध

Raigad Monsoon Tourism Restrictions 2026: रायगड जिल्ह्यातील देवकुंड, ताम्हाणी घाटसह चार प्रमुख पर्यटन स्थळांवर 30 सप्टेंबरपर्यंत कडक निर्बंध लागू. पर्यटकांनी सुरक्षिततेचे नियम पाळण्याचे आवाहन.
Tourists restricted at Raigad’s popular waterfalls amid safety concerns during monsoon
Tourists restricted at Raigad’s popular waterfalls amid safety concerns during monsoonsaam tv
Published On

पावसाळा सुरू होताच पर्यटकांची पावले रायगड जिल्ह्यातील निसर्गरम्य धबधबे आणि नद्यांकडे वळू लागली आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांत अतिउत्साही पर्यटकांमुळे घडणाऱ्या दुर्घटना आणि जीवितहानी लक्षात घेता, रायगड जिल्हा प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील प्रमुख धबधबे, नद्या आणि पर्यटन स्थळांच्या ठिकाणी कडक प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. प्रशासनाचा हा आदेश आगामी 30 सप्टेंबरपर्यंत लागू राहणार आहे.

Tourists restricted at Raigad’s popular waterfalls amid safety concerns during monsoon
Maharashtra Politics: उल्हासनगरमध्ये शिंदेसेनेला दुसरा मोठा धक्का, आणखी एका नगरसेविकेचे पद गेलं

'या' प्रसिद्ध पर्यटन स्थळांवर निर्बंध

माणगाव तालुका आणि परिसरातील अत्यंत लोकप्रिय पण धोकादायक ठरणाऱ्या खालील पर्यटन क्षेत्रांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

देवकुंड धबधबा

ताम्हाणी घाट

कुंभे धबधबा

सिक्रेट पॉईंट आणि परिसरातील नद्या-नाले

Tourists restricted at Raigad’s popular waterfalls amid safety concerns during monsoon
मरणानंतरही मरणयातना! हिंगोलीत शेडअभावी भर पावसात ३० लिटर डिझेल टाकून पेटवली चिता

काय आहेत नवे नियम?

पर्यटकांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने पुढील गोष्टींवर कठोर कायदेशीर निर्बंध घातले आहेत. धोकादायक पाण्यात उतरणे: धबधब्यांच्या खाली किंवा नद्यांच्या खोल आणि वेगवान पात्रात उतरण्यास सक्त मनाई आहे.

मद्यपान करून हुल्लडबाजी: पर्यटन स्थळांवर दारू पिऊन मौजमजा करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल.

धोकादायक सेल्फी: जीव धोक्यात घालून धबधब्यांच्या कड्यावर किंवा पाण्याच्या प्रवाहात सेल्फी काढण्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.

Tourists restricted at Raigad’s popular waterfalls amid safety concerns during monsoon
अमावस्येला पूजा करून महिलेसोबत अश्लील कृत्य, भोंदू भोसलेचं भयंकर कृत्य, सोलापूर हादरले

अतिउत्साही पर्यटकांमुळे गंभीर दुर्घटना घडण्याची शक्यता असते. पर्यटकांनी आपल्या जिवाची काळजी घ्यावी. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल. पावसाळ्याचा आनंद जरूर घ्या, पण प्रशासनाच्या नियमांचे पालन करून सुरक्षित पर्यटन करा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com