'घरी ये नाहीतर, तुझे फोटो..'; वस्तीतील तरूणाकडून अल्पवयीन मुलीवर जबरदस्ती, अलिबागमध्ये खळबळ

16-Year-Old Girl Harassed Under Blackmail in Alibag: अलिबाग शहरात १६ वर्षीय मुलीसोबत विनयभंगाचा धक्कादायक प्रकार. सोशल मीडियावर फोटो व्हायरल करण्याची धमकी.
16-Year-Old Girl Harassed Under Blackmail in Alibag
16-Year-Old Girl Harassed Under Blackmail in AlibagSaam Tv
Published On

रायगडमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. अलिबाग शहरात एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याची घटना उघडकीस आली आहे. आरोपीनं पीडितेचे मित्रासोबत असलेले वैयक्तिक फोटो सोशल मीडियावर प्रसारित करण्याची धमकी देत तिचा विनयभंग केला. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपीवर गुन्हा नोंदवला. दरम्यान, आरोपीला अटक करण्यासाठी पोलिसांनी विशेष पथक तयार केले आहे. सध्या पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी हा मुलीच्या वस्तीतीलच रहिवासी आहे. मे २०२४ ते १९ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत त्याने वारंवार धमकावत मुलीला आपल्या घरी बोलावून तिच्याशी अशोभनीय वर्तन केले. दीर्घकाळ सुरू असलेल्या त्रासाला कंटाळून तिनं अखेर पोलिसांकडे तक्रार दाखल करण्याच निर्णय घेतला.

16-Year-Old Girl Harassed Under Blackmail in Alibag
सोनं खरेदीदारांसाठी सुवर्णयोग; १० तोळं सोनं १९ हजारांनी स्वस्त, चांदीच्या भावातही कमालीची घट

या प्रकरणी तरूणीनं पोलिसांकडे तक्रार दाखल केली. या प्रकरणात काही राजकीय पदाधिकाऱ्यांनी पोलिसांवर दबाव टाकत गुन्हा दाखल होऊ नये, असा प्रयत्न केला. मात्र, या प्रकरणात पोलिासांनी कुणाच्या दबावाला बळी न पडता आरोपीविरूद्ध गुन्हा नोंदवला. आरोपीवर पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

16-Year-Old Girl Harassed Under Blackmail in Alibag
गर्ल्स हॉस्टेलमध्ये वापरलेल्या कंडोमचा खच; घटनेमागचं सत्य काय? 'हा' व्हिडिओ नेमका कुठला?

या धक्कादायक घटनेत काही राजकीय ओळख असलेल्या व्यक्तींनी गुन्हा नोंदविण्यास अडथळा निर्माण केला होता, अशी भागात चर्चा सुरू आहे. परंतु, पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळण्यासाठी आरोपीविरोधात गुन्हा नोंदवला. या घटनेमुळे अलिबागमध्ये संतापाची लाट उसळली. स्थानिक रहिवाशांनी आरोपीला कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com