Today Gold Rate
Today Gold RateSaam Tv

सोनं खरेदीदारांसाठी सुवर्णयोग; १० तोळं सोनं १९ हजारांनी स्वस्त, चांदीच्या भावातही कमालीची घट

Gold Rate Falls Sharply in India Ahead of Month-End: आज सोनं अन् चांदीच्या भावात घसरण पाहायला मिळत आहे. २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याच्या भावात १९१० रूपयांची घसरण झाली आहे. तर, चांदीच्या भावात १००० रूपयांची घसरण झाली आहे.
Published on

गेल्या काही दिवसांपासून सोनं अन् चांदीच्या भावात कमालीचा चढ उतार पाहायला मिळत आहे. दिवाळीत सोन्याच्या दरात घसरण झाली होती. मात्र, त्यानंतर सोन्याच्या भावात वाढ झाली असल्याचं पाहायला मिळालं. विक्रमी वाढीनंतर आज सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. तसेच चांदीच्या दरातही घसरण झाली आहे. सोनं आणि चांदी खरेदीसाठी आज सुवर्णयोग म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

आज ३० ऑक्टोबर २०२५. महिना अखेरीस सोन्याच्या भावात घट झाली आहे. २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याच्या दरात १,९१० रूपयांची घसरण झाली आहे. २४ कॅरेट १ तोळं सोनं खरेदीसाठी आपल्याला १,२०,४९० रूपये मोजावे लागतील. तर, २४ कॅरेट १०० ग्रॅम सोन्याच्या दरात १९,१०० रूपयांची घसरण झाली आहे. २४ कॅरेट १० तोळं सोनं खरेदीसाठी आपल्याला १२,०४,९०० रूपये मोजावे लागतील.

Today Gold Rate
गर्ल्स हॉस्टेलमध्ये वापरलेल्या कंडोमचा खच; घटनेमागचं सत्य काय? 'हा' व्हिडिओ नेमका कुठला?

२४सह २२ कॅरेट सोन्याच्या भावातही घसरण झाली आहे. २२ कॅरेट १० ग्रॅम सोन्याच्या दरात १,७५० रूपयांची घसरण झाली आहे. २२ कॅरेट १ तोळं सोनं खरेदीसाठी आपल्याला १,१०,४५० रूपये मोजावे लागतील. तर, २२ कॅरेट १०० ग्रॅम सोन्याच्या दरात १७,५०० रूपयांची घसरण झाली आहे. २२ कॅरेट १० तोळं सोनं खरेदीसाठी आपल्याला ११,०४,५०० रूपये मोजावे लागतील.

१८ कॅरेट सोन्याच्या दरातही घसरण पाहायला मिळत आहे. १८ कॅरेट १० ग्रॅम सोन्याच्या भावात १,४३० रूपयांची घसरण झाली आहे. १८ कॅरेट १ तोळं सोनं खरेदीसाठी आपल्याला ९०,३७० रूपये मोजावे लागतील. तर, १८ कॅरेट १०० ग्रॅम सोन्याच्या दरात १४,३०० रूपयांची घसरण झाली आहे. १८ कॅरेट १० तोळं खरेदीसाठी आपल्याला ९,०३,७०० रूपये मोजावे लागतील.

Today Gold Rate
वयानं मोठ्या तरूणीवर जीव जडला; १७ वर्षीय मुलानं वडिलांना सुसाईड नोट पाठवून आयुष्य संपवलं

सोन्यासह चांदीही स्वस्त झाली आहे. १ किलो चांदीमागे १००० रूपयांची घसरण झाली आहे. १ किलो चांदी खरेदीसाठी आपल्याला १,५१,००० रूपये मोजावे लागतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com