Raigad Accident: मुंबई- गोवा महामार्गावर अपघाताचा थरार, भरधाव कारची कंटेनरला धडक; आई अन् मुलीचा जागीच मृत्यू

Mumbai-Goa Highway Accident: रायगडमध्ये मुंबई- गोवा महामार्गावर भीषण अपघात झाला. भरधाव कार कंटेनरला धडकली. या अपघातामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला.
Raigad Accident: मुंबई-गोवा महामार्गावर अपघाताचा थरार, भरधाव कारची कंटेनरला धडक; आई अन् मुलीचा जागीच मृत्यू
Raigad AccidentSaam Tv
Published On
  • मुंबई- गोवा महामार्गावर भीषण अपघात

  • पोलादपूरमध्ये कार कंटेनरला धडकली

  • आई आणि मुलीचा जागीच मृत्यू

  • वडील आणि मुलगा गंभीर जखमी

सचिन कदम, रायगड

रायगडमध्ये मुबंई- गोवा महामार्गवर भीषण अपघाताची घटना घडली. भरधाव कारने कंटेनरला पाठीमागून धडक दिली. या अपघातामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ० मुबंई -गोवा महामार्गवर पोलादपूर तालुक्यात लोहारमाळ गावाच्या हद्दीत ही घटना घडली. रत्नागिरीच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर उभ्या असलेल्या कंटेनरला कारने पाठीमागून धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये कारचा चुराडा झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई- गोवा महामार्गावर पोलादपुर हद्दीत कारला भीषण अपघात झाला. रस्त्याच्या शेजारी उभे असलेल्या कंटेनरच्या मागील बाजूस ही भरधाव कार जाऊन आदळली. अपघातामध्ये कारचा चक्काचुर झाला. या अपघातात आई आणि मुलगी अशा दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. तर वडील आणि मुलगा गंभीर जखमी झाले आहेत.

Raigad Accident: मुंबई-गोवा महामार्गावर अपघाताचा थरार, भरधाव कारची कंटेनरला धडक; आई अन् मुलीचा जागीच मृत्यू
Accident: महामार्गावर अपघाताचा थरार, भरधाव पिकअप उलटला; २ मुलांसह १२ जणांचा मृत्यू

अपघातामध्ये सुवर्णा मार्कंडे आणि अनुश्री मार्कंडे या दोघींचा मृत्यू झाला. तर अनिल मार्कंडे आणि त्यांचा मुलगा गंभीर जखमी झाला. त्यांना उपचारासाठी एमजीएम रुग्णालय नवी मुंबई येथे दाखल करण्यात आले आहे. तर चिन्मय मार्कंडे याच्यावर महाडमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Raigad Accident: मुंबई-गोवा महामार्गावर अपघाताचा थरार, भरधाव कारची कंटेनरला धडक; आई अन् मुलीचा जागीच मृत्यू
Accident: भरधाव डंपरची रिक्षाला धडक, ५ जणांचा जागीच मृत्यू

अनिल मार्कंडे हे दापोली कृषी विद्यापिठ येथे कार्यरत असून मार्कंडे कुटुंबीय नगर येथून दापोली येथे जात असताना पोलादपुर तालुक्यातील लोहार माळ गावच्या हद्दीत हा अपघात झाला. या अपघातानंतर महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. आई आणि मुलीचा जागीच मृत्यू झाल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. रायगड पोलिस या अपघाताचा तपास करत आहेत.

Raigad Accident: मुंबई-गोवा महामार्गावर अपघाताचा थरार, भरधाव कारची कंटेनरला धडक; आई अन् मुलीचा जागीच मृत्यू
Accident: भाविकांवर काळाचा घाला, महामार्गावर ट्रॅक्टर-ट्रॉली उलटली; ६ जणांचा जागीच मृत्यू

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com