Rahuri By-Election: राहुरी पोटनिवडणूक होणार चुरशीची; ठाकरेंचा हुकमी एक्का उतरला रिंगणात, पण...

Rahuri By-Election : ठाकरे गटाचे नेते रावसाहेब खेवरे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने राहुरी पोटनिवडणुकीला नाट्यमय वळण लागले आहे.
Rahuri By-Election
Raosaheb Khevre files independent nomination, adding a new twist to the Rahuri by-election. Saam Tv
Published On
Summary
  • राहुरी पोटनिवडणुकीत मोठा राजकीय ट्विस्ट

  • प्राजक्त तनपुरे यांची ऐनवेळी माघार

  • रावसाहेब खेवरे अपक्ष म्हणून मैदानात

सचिन बनसोडे, साम प्रतिनिधी

अहिल्यानगरच्या राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत अनेक नाट्यमय घडामोडी बघायला मिळत आहेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्राजक्त तनपुरे यांनी ऐनवेळी माघार घेतली, तर मविआतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा संघटक रावसाहेब खेवरे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. तालुक्याच्या अस्मितेसाठी आपण उमेदवारी करत असल्याचं खेवरे यांनी अर्ज भरताना म्हटलंय.

Rahuri By-Election
धड भाषणही देता येत नाही, कुटुंबाच्या पूर्वपुण्याईवर खासदार; काँग्रेसचा नाव न घेता पार्थ पवारांवर सणसणीत पलटवार

तालुक्यातील सक्षम उमेदवार नसल्याने एक सक्षम उमेदवार म्हणून मी निवडणूक लढवत आहे. मातोश्रीवरून जर निरोप आला तर आपली भूमिका काय असेल असे विचारले असता, ते म्हणाले की, मी मातोश्रीवरून आलेल्या आदेशाचा नेहमीच आदर करतो, मात्र मातोश्रीवरून आदेश का येईल? काँग्रेसने स्वतंत्र एबी फॉर्म दिला, मलाही एबी फॉर्म मिळत होता मात्र मी कडवड हिंदू आहे. तालुक्याच्या प्रश्नांसाठी मी निवडणूक लढवत आहे, असं खेवरे यांनी म्हटलंय आहे.

Rahuri By-Election
Maharashtra Politics: कोकणात ठाकरेसेनेला मोठं खिंडार, बड्या नेत्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी सोडली साथ; 'धनुष्यबाण' घेणार हाती

दरम्यान अहिल्यानगरच्या राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी एकूण 30 उमेदवारांनी 42 उमेदवारी अर्ज दाखल केले होते. आज झालेल्या छाननी प्रक्रियेत 7 उमेदवारांचे अर्ज अपात्र ठरवण्यात आले. एका उमेदवाराने आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतलाय. तर 23 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत अशी माहिती सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार डॉ. अमित पवार यांनी दिली आहे.

भाजप नेते शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी येत्या 23 एप्रिलला मतदान होणार आहे. तर 4 मे रोजी या पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर होईल. राहुरी विधानसभा मतदारसंघात भाजपने दिवंगत नेते शिवाजीराव कर्डिले यांचे पुत्र अक्षय कर्डिले यांना उमेदवारी दिली आहे. तर शरद पवार गटाकडून प्राजक्त तनपुरे हे निवडणूक लढवणार असल्याची चर्चा होती. मात्र ऐनवेळी प्राजक्त तनपुरे उमेदवारी यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com