Akshay Kardile: राहुरीत पुन्हा कर्डिले पॅटर्न! शरद पवारांच्या उमेदवाराचा १ लाख मतांनी पराभव; वडिलांच्या आठवणीत अक्षय झाले भावुक

Rahuri By Poll Election 2026: राहुरीमध्ये भाजपने गड राखला. राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले विजयी झाले. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवाराचा दारूण पराभव केला.
Akshay Kardile : राहुरीत पुन्हा कर्डिले पॅटर्न! शरद पवारांच्या उमेदवाराचा १ लाख मतांनी पराभव; वडिलांच्या आठवणीत अक्षय झाले भावुक
Akshay Kardile Saam Tv
Published On

Summary -

  • राहुरी पोट निवडणुकीमध्ये अक्षय कर्डिले यांचा मोठा विजय

  • १ लाखांहून अधिक मताधिक्याने मारली बाजी

  • अक्षय कर्डिले वडिलांच्या आठवणीत झाले भावुक

  • विजयानंतर भाजप कार्यकर्त्यांकडून जल्लोष

राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये अक्षय कर्डिले विजयी झाले आहेत. भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनानंतर राहुरीमध्ये पोटनिवडणूक पार पडली. या निवडणुकीत भाजपने शिवाजी कर्डिले यांचे चिरंजीव अक्षय कर्डिले यांना उमेदवारी दिली होती. अक्षय कर्डिले यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवार रिंगणात उतरवला होता. पण या निवडणुकीमध्ये अक्षय कर्डिले यांनी विरोधकांचा सुपडा साफ केला. राहुरी पोटनिवडणुकीत अक्षय कर्डिले यांनी १ लाखांहून अधिकचे मताधिक्य मिळवले. त्यांच्या विजयानंतर भाजप कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.

राहुरी पोटनिवडणुकीमध्ये भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले यांचा १ लाखांपेक्षा जास्त मतांनी विजय झाला. त्यांनी विरोधकांचा सुपडा साफ केला. हा विजय त्यांनी वडिलांना समर्पित केला. या वेळी माध्यमांशी संवाद साधताना अक्षय कर्डीले यांनी आयुष्यभर जनतेसाठी काम करणार असल्याचे सांगितले. तसंच त्यांनी प्राजक्त तनपुरे यांना भेटून आभार मानेन असे देखील सांगितले.

Akshay Kardile : राहुरीत पुन्हा कर्डिले पॅटर्न! शरद पवारांच्या उमेदवाराचा १ लाख मतांनी पराभव; वडिलांच्या आठवणीत अक्षय झाले भावुक
BJP: मतमोजणी बाकी, पण अभिनंदन सुरू, भाजपला फुल कॉन्फिडन्स...; पोस्टरबाजीमुळे राहुरीच्या विजयाची पुण्यात चर्चा

विजयानंतर माध्यमांशी बोलताना अक्षय कर्डिले म्हणाले की, 'आज माझे वडील असते तर खूप आनंद झाला असता. मला ज्यांनी ज्यांनी मदत केली मी त्यांना कधीच विसरू शकत नाही. येत्या काळात मी त्या सर्वांना मदत करेल.' अक्षय कर्डिले यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने गोविंद मोकाटे यांना उमेदवारी दिली होती. अक्षय कर्डिले आणि गोविंद मोकाटे यांच्यात तगडी लढत झाली. अखेर अक्षय कर्डिले यांना विजय मिळवण्यात यश आले. या विजयानंतर अक्षय कर्डिले यांना खांद्यावर घेऊन आणि गुलाल उधळत भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

Akshay Kardile : राहुरीत पुन्हा कर्डिले पॅटर्न! शरद पवारांच्या उमेदवाराचा १ लाख मतांनी पराभव; वडिलांच्या आठवणीत अक्षय झाले भावुक
Rahuri Election : राहुरी पोटनिवडणूक बिनविरोध नाहीच! भाजप-शरद पवार गटात मुख्य लढत, हे ७ उमेदवार रिंगणात, VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com