Election Result Live : पश्चिम बंगालमध्ये मोठा उलटफेर! भाजप आघाडीवर, ममतांना मोठा धक्का; केरळमध्ये चुरशीची लढत

Assembly Election Results Live Update : पश्चिम बंगालमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये भाजप आघाडीवर असून ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का बसल्याचे दिसत आहे. केरळमध्ये काँग्रेस आणि एलडीएफमध्ये चुरशीची लढत सुरू आहे.
Mamata Banerjee
Mamata Banerjee saam tv
Published On

पश्चिम बंगाल, तामिळनाडू, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरी या ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकालाचे सुरूवातीचे कल समोर आली आहे. पश्चिम बंगालमध्ये सुरूवातीच्या कलांमध्ये ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का बसला आहे. सुरूवातीच्या कलांमध्ये भाजपने जोरदार आघाडी घेतली आहे. ममता बॅनर्जी यांच्या टीएमसीकडूनही जोरदार टक्कर मिळत आहे. पण सध्या तरी सुरूवातीच्या कलांमध्ये भाजपच आघाडीवर आहे. दुसरीकडे केरळमध्ये काँग्रेसलाही चांगले यश मिळत आहे.

एप्रिल महिन्यात पार पडलेल्या या विधानसभा निवडणुकांमध्ये सर्वच चुरशीची लढत पाहायला मिळाली. मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर सर्व केंद्रांवर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आलेली आहे. सुरुवातीला टपाल मतपत्रिकांची मोजणी होईल आणि त्यानंतर ईव्हीएममधील मतांची मोजणी सुरू होईल. दुपारपर्यंत कल स्पष्ट होण्याची शक्यताय. या निकालांकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय. अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागलीय.

Mamata Banerjee
सोलापूर हादरलं! भररस्त्यात ३५ वार, डोकं चेंदामेंदा; चेहरा ओळखणंही कठीण, 'त्या' भयंकर हत्याकांडाचा थरारक Video समोर

पश्चिम बंगालमध्ये भाजप आघाडीवर, तर केरळमध्ये बरोबरी कायम

सुरूवातीच्या कलांमध्ये पश्चिम बंगालमध्ये भाजप ४० जागांसह आघाडीवर आहे. तर टीएमसीच्या ३५ जागा आघाडीवर आहेत. केरळमध्ये एलडीएफ आणि यूडीएफ प्रत्येकी ३ जागांवर बरोबरीत आहेत, तर आसाममध्ये भाजप २३ जागांसह आघाडीवर असून काँग्रेसच्या ४ जागा आहेत. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्याकडून भाजपला जोरदार टक्कर दिली जात आहे. काही वेळातच पश्चिम बंगाल, केरळ आणि तामिळनाडूमधील निकाल समोर येईल.

आसाममध्ये भाजपचा एकतर्फी विजय होण्याची शक्यता आहे.

Mamata Banerjee
विदर्भ हादरला! नायब तहसीलदाराची आत्महत्या, राहत्या फ्लॅटमध्ये घेतला गळफास

राहुरी-बारामतीत काय स्थिती ?

सुरूवातीच्या कलांमध्ये बारामतीमध्ये सुनेत्रा पवार तर राहुरीत अक्षय कर्डीले आघाडीवर आहेत. पोस्टल मतांमध्ये सत्ताधाऱ्यांना मोठं यश मिळाले आहे. थोड्याच वेळात ईव्हीएममधील मतमोजणीला सुरूवात होईल. या दोन्ही ठिकाणी सत्ताधाऱ्यांचा विजय होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे.

भाजपच्या मुख्यालयात जेवणाची तयारी जोरात सुरू आहे

आसाम, केरळ, तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि पुदुचेरीमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मतमोजणी सुरू झाली आहे. दुसरीकडे नवी दिल्लीतील भाजप मुख्यालयात जोरदार तयारी सुरू झाली. कार्यकर्ते आणि समर्थकांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली.

४०० ते ५०० लोकांसाठी सकाळपासूनच सँडविच, आलू पुरी, पोहे आणि जिलेबी यांचा समावेश असलेला नाश्त्याचा तयार करण्यात आला. तसेच पसारा, सोबत लस्सी, फळे आणि पारंपरिक मिठाई तयार करण्यात आली होती. दुपारच्या जेवणाच्या व्यवस्थेमध्ये डाळ, कढी, भाजी, भात आणि पापड, सोबत रसगुल्ला आणि जिलेबी यांसारख्या गोड पदार्थांचा समावेश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com