बारामती-राहुरीच्या पोटनिवडणुकीचा आज फैसला; अक्षय कर्डिले-सुनेत्रा पवारांच्या निकालाकडे राज्याचे लक्ष

Baramati Rahuri bypoll result live : बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार असून मतमोजणी प्रक्रिया सुरू झाली आहे.
Baramati Rahuri vote counting underway
Officials oversee vote counting in Baramati and Rahuri as crucial bypoll results are awaited.Saam TV Marathi
Published On

Maharashtra by-election 2026 updates : राज्यातील दोन महत्त्वाच्या विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीचा निकाल आज स्पष्ट होणार असून, राहुरी आणि बारामतीमध्ये मतमोजणीची जय्यत तयारी करण्यात आली आहे. राहुरीमध्ये ५६ टक्के मतदान झाले असून, धुमाळ महाविद्यालयात २० टेबलांवर २७ फेऱ्यांमध्ये ही प्रक्रिया पार पडेल; येथे भाजपाचे अक्षय कर्डिले यांचे पारडे जड मानले जात आहे. दुसरीकडे, संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या बारामती पोटनिवडणुकीची मतमोजणी वखार महामंडळाच्या गोडाऊनमध्ये होत आहे. ५८.२७ टक्के मतदान झालेल्या बारामतीत सुनेत्रा पवार यांचा विजय निश्चित मानला जात असून, दोन्ही ठिकाणची राजकीय परिस्थिती दुपारी १२ वाजेपर्यंत स्पष्ट होईल.

बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठीही आज मतमोजणी पार पडणारेय. वखार महामंडळाच्या गोडाऊनमध्ये बारातमती पोटनिवडणुकीची मतमोजणी होणार आहे. तर दुसरीकडे राहुरी पोटनिवडणुकीची मतमोजनी धुमाळ महाविद्यालयात होणार आहे. मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनानं जय्यत तयारी केली असून परिसरात कडक बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय.

राहुरी पोटनिवडणुकीची आज मतमोजणी, प्रशासनाकडून जय्यत तयारी

राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची सोमवारी मतमोजणी होणार आहे. २० टेबलांवर ही मतमोजणी होणार असून २७ फेऱ्या होणार आहेत. राहुरी शहरातील धुमाळ महाविद्यालयात ही मतमोजणीची प्रक्रिया पार पडेल. पोटनिवडणुकीसाठी ५६ टक्के मतदान झाले असून १ लाख ८७ हजार ४६३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. भाजपाचे अक्षय कर्डिले यांचे पारडे जड वाटत असले, तरी आमदारकीचा गुलाल कुणाच्या अंगावर पडणार हे दुपारी १२ वाजेपर्यंत स्पष्ट होईल.

Baramati Rahuri vote counting underway
Baramati bypoll : बारामतीमध्ये सुनेत्रा पवार गाठणार "मॅजिक फिगर"? अजितदादांचा विक्रम मोडला जाणार?

बारामती पोटनिवडणुकीचा आज निकाल; सुनेत्रा पवारांचे पारडे जड, प्रशासनाकडून जय्यत तयारी

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी २३ एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर, आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या या निवडणुकीची मतमोजणी आज पार पडणार आहे. या पोटनिवडणुकीत ५८.२७ टक्के बारामतीकरांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला होता. मतमोजणीची ही प्रक्रिया बारामती येथील वखार महामंडळाच्या गोडाऊनमध्ये पार पडणार असून, प्रशासनाकडून यासाठी आवश्यक ती सर्व जय्यत तयारी पूर्ण करण्यात आली आहे. बारामतीच्या पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांचा विजय निश्चित मानला जातोय.

Baramati Rahuri vote counting underway
Maharashtra Politics : महाराष्ट्राला मिळाले १० नवे आमदार, सर्व यादी एका क्लिकवर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com