

श्रमलेल्या लेकीसाठी बाप नारळाचं पाणी
बापासाठी लेकीने दिली किडनी
आमदार शिवतारे यांना मुलगी ममता शिवतारे यांनी दिली किडनी
वडिलांना दिले जीवनदान
बाप लेकीच्या प्रेमाचे उत्तम उदाहरण
सचिन जाधव, साम टीव्ही प्रतिनिधी
वडील आणि मुलीचं नातं हे फार वेगळं असते. लहानपणी बाप लेकीचा आधार बनतो तर कठीण काळात मुलगी वडिलांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असते. असंच बाप-लेकीच्या प्रेमळ नात्याचे हृदयस्पर्शी उदाहरण समोर आले आहे. पुरंदर-हवेलीचे आमदार विजय शिवतारे यांना त्यांच्या कन्या डॉ. ममता शिवतारे यांनी किडनी दान करून नवजीवन दिले आहे. वडिलांना पुन्हा एकदा नव्या उमेदीने जीवन जगण्याची संधी त्यांच्या लेकीने दिली आहे.
विजय शिवतारे आणि ममता शिवतारे यांची चर्चा
संपूर्ण राज्यभर विजय शिवतारे आणि त्यांची लेक ममता शिवतारे यांच्या त्यागमय नात्याची चर्चा रंगली आहे.आमदार आ. विजय शिवतारे यांना किडनीचा आजार होता. गेल्या काही महिन्यांपासून किडनी निकामी झाल्यामुळे डायलिसिसवर उपचार घेत होते. त्यांच्या प्रकृतीत सातत्याने बिघाड होत असताना कुटुंबीयांवर चिंतेचे सावट होते. अशा कठीण प्रसंगी त्यांच्या लेकीने पुढाकार घेत वडिलांना किडनी दान करण्याचा निर्णय घेतला.
डॉक्टर लेकीने वडिलांना दिली किडनी (Daughter Mamata Shivtare Donate Kidney to Father)
शिवतारेंची लेक डॉ. ममता शिवतारे ह्या व्यवसायाने डॉक्टर आहेत. त्या केवळ वैद्यकीय क्षेत्रात सेवा देत नाहीत, तर त्यांनी एक कर्तव्यदक्ष मुलगी म्हणूनही आदर्श निर्माण केला आहे. वडिलांच्या जिवासाठी स्वतःची किडनी दान केली आहे. त्यांनी अपार प्रेम, कर्तव्य आणि त्यागाची पराकाष्ठा दाखवून दिली आहे.मुंबई येथे किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली असून.दोघांचीही प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. या घटनेमुळे केवळ शिवतारे कुटुंबालाच नव्हे, तर संपूर्ण पुरंदर तालुका आणि महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी संदेश मिळाला आहे.
विजय शिवतारे यांचा प्रवास (MLA Vijay Shivtare Inspiring Story)
दरम्यान, आमदार विजय शिवतारे ऊर्फ 'बाप्पू' हे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते असून, त्यांनी २००९ आणि २०१४ मध्ये पुरंदर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. २०१९ मध्ये पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर २०२४ मध्ये त्यांनी पुन्हा विजय मिळवत विधानसभेत पुनरागमन केले. राज्य मंत्रिमंडळातही त्यांनी यापूर्वी महत्त्वाची जबाबदारी सांभाळली आहे. या घटनेतून 'लेकीच्या रूपानेच देव माणसाला धावून येतो,' अशी भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.