Pediatric Kidney Cancer: 2 ते 5 वर्षांच्या मुलांमध्ये वाढतोय धोका, लहानग्यांमध्ये दिसणाऱ्या किडनी कॅन्सरची लक्षणं वेळेत ओळखा

Wilms Tumor in Children: लहान मुलांमध्ये आढळणारा विल्म्स ट्यूमर हा दुर्मिळ किडनी कॅन्सर आहे. पोटात सूज, ताप, लघवीत रक्त दिसणं यासारखी लक्षणं दुर्लक्षित करू नका. वेळेत निदान केल्यास उपचार शक्य आहेत.
Pediatric Kidney Cancer
Pediatric Kidney Cancersaam tv
Published On

लहान मुलांमध्ये कॅन्सर प्रमाण कमी असलं तर अनेकदा दुर्मिळ प्रकरणं समोर येताना दिसतात. असाच एक किडनीचा कॅन्सर ज्याची अनेकांना माहिती नसते. ‘विल्म्स ट्यूमर’ असं त्याचं नाव असून हा लहान मुलांमध्ये दिसणारा दुर्मिळ किडनीचा कॅन्सर मानला जातो.

हा कॅन्सर जरी दुर्मिळ असला तरी वेळेवर त्याचं निदान न झाल्यास तो धोकादायक ठरू शकतो. विशेषतः 2 ते 5 वयोगटातील मुलांमध्ये हा आजार अधिक प्रमाणात आढळतो आणि सुरुवातीला त्याची लक्षणं लगेच ओळखू येत नाहीत. त्यामुळे या आजाराची लक्षणं काय आहेत ती जाणून घेऊया.

पोटात सूज किंवा गाठ

या समस्येचं एक महत्त्वाचं आणि सामान्यपणे दुर्क्षिक केलं जाणारं लक्षण म्हणजे मुलाच्या पोटात दिसणारी सूज किंवा गाठ. ही सूज आल्याने मुलाच्या पोटात दुखत नाही. त्यामुळे पालकांना या गाठीचं निदान करणं शक्य होत नाही. अनेकदा मुलाला आंघोळ घालताना किंवा खेळताना ही गाठ लक्षात येते. मुख्य म्हणजे ही गाठ ही पोट फुगल्यासारखी दिसत नाही. काही पालक याकडे बद्धकोष्ठता किंवा साधा पोटदुखीचा त्रास समजून दुर्लक्ष करतात.

Pediatric Kidney Cancer
Period Health: २१ दिवसांनंतर मासिक पाळी येणं नॉर्मल आहे का? डॉक्टरांनी सांगितलं किती छोटी असून शकते पिरीयड्स सायकल

विनाकारण येणारा ताप

जर मुलाला वारंवार ताप येत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नये. लहान मुलांना कोणताही ठोस कारण नसताना सतत ताप येत असेल तर ते गंभीर गोष्टीचं लक्षण असू शकतं. अशा मुलांमध्ये थकवा, भूक कमी होणं आणि नेहमीच अशक्तपणा जाणवणं ही लक्षणंही दिसून येतात.

लघवीमध्ये रक्त दिसणं

लहान मुलांच्या लघवीमध्ये जर तुम्हाला रक्त दिसत असेल तर तातडीने डॉक्टरांकडे जाणं महत्त्वाचं आहे. थेट लघवीत रक्त दिसण्याशिवाय लघवीचा रंग हलका गुलाबी दिसू शकतो. अनेक वेळा याकडे युरीनरी इन्फेक्शन म्हणूनही दुर्लक्ष केलं जातं. मात्र जराही त्रास दिसला तरी डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्याबाबतच्या टेस्ट करून घ्याव्यात.

Pediatric Kidney Cancer
AC Side Effects: सतत एसीमध्ये बसून डोकं जड होतं? सावध रहा, शरीरावर होऊ शकतात गंभीर परिणाम

पोटदुखी

काही मुलं पोटदुखी किंवा पोटाच्या बाजूला दुखण्याची तक्रार करतात. हा त्रास मुलांना खेळताना किंवा कोणतीही हालचाल करताना होऊ शकतं. हे दुखणं अनेकदा गॅस किंवा मसल पेन समजून दुर्लक्ष केलं जातं. पण एकाच ठिकाणी वारंवार त्रास होत असेल तर ते गंभीर संकेत असू शकतात.

Pediatric Kidney Cancer
Period pain after 30: वयाच्या तिशीनंतर मासिक पाळी अधिक त्रासदायक होते? डॉक्टरांनी दिलं महिलांच्या मनातील प्रश्नाचं उत्तर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com