

मासिक पाळी म्हटलं की महिलांना होणाऱ्या वेदना आपल्या डोळ्यासमोर येतात. काही महिलांना या काळात तीव्र वेदना होतात. तर काही महिलांच्या मनात असा प्रश्न असतो की, जसं-जसं वय वाढतं तशा या वेदना अधिक होत जातात का? तर काही महिलांना या विरूद्धही वाटतं. मात्र खरंच वाढत्या वयानुसार मासिक पाळीच्या वेदना वाढतात का?
साधारणपणे २५-३५ या वयोगटातील महिलांना हा त्रास सतावतो. वयाच्या २५ नंतर मासिक पाळी आली की, जास्त क्रॅम्प्स, मसल पेन किंवा जास्त प्रमाणात रक्तस्राव होतो. ओनली माय हेल्थ या वेबसाईटला माहिती देताना हैदराबादच्या रूग्णालयातील यशोदा हॉस्पिटलमधील गायनेकोलॉजिस्ट, डॉ. शिल्पा रेड्डी यांनी याबाबत माहिती दिलीये.
डॉ. शिल्पा रेड्डी यांच्या माहितीनुसार, मासिक पाळीतील वेदना या गर्भाशयातील मसल्स आकुंचन पावल्यामुळे होतात. पिरीयड्समध्ये आपलं शरीर एका पद्धतीचं केमिकल रिलीज करतं. जे गर्भाशयातील रक्त आणि टिश्यू काढून टाकण्यास मदत करतात. जर हे केमिकल जास्त प्रमाणात रिलीज झालं तर महिलांना जास्त त्रास सहन करावा लागतो.
काही महिलांमध्ये वयाच्या तिशीनंतर पिरीयड्स पूर्वीच्या मानाने जास्त वेदनादायक होतात. डॉ. रेड्डी यांनी सांगितलं की, जसं वय वाढतं तसं पिरीड्सच्या वेदना वाढू शकतात. मात्र नेहमी जास्तच त्रास होईल असं नाही. शरीरात होणाऱ्या हार्मोनल बदलानुसार हा त्रास होत राहतो.
30 वर्षांनंतर शरीरातील एस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन या हार्मोन्समध्ये बदल होतात. यामुळे गर्भाशयात सूज निर्माण होऊ शकते आणि क्रॅम्प्स अधिक तीव्र होतात.
25 ते 35 वयोगटातील अनेक महिलांमध्ये एंडोमेट्रियोसिसची लक्षणं दिसू लागतात. या अवस्थेत गर्भाशयाच्या आतील थरासारख्या पेशी इतर ठिकाणी वाढतात. ज्यामुळे खूप वेदना होतात.
30 ते 40 वयोगटात फायब्रॉइड्स होण्याचं प्रमाण जास्त असतं. यामध्ये गर्भाशयाच्या भिंतीवर तयार होणाऱ्या गाठी असतात. या गाठी कॅन्सरच्या नसतात पण त्यामुळं जास्त रक्तस्राव आणि वेदना होऊ शकतात.
वारंवार होणाऱ्या संसर्गामुळे पेल्विक भागात सूज निर्माण होते. त्यामुळे पीरियडच्या वेदना आणखी वाढू शकतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.