Sanjay Raut: नाशिकमध्ये ८०० कोटींचा भूसंपादन घोटाळा.. संजय राऊतांचा मोठा आरोप; CM शिंदेंवर निशाणा

Sanjay Raut News: नाशिक महापालिकेत भूसंपादनाच्या नावाखाली ८०० कोटींचा घोटाळा झाल्याचा खळबळजनक आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
Sanjay Raut
Sanjay RautYandex

मयुर राणे, मुंबई|ता. ६ मे २०२४

नाशिक महापालिकेत भूसंपादनाच्या नावाखाली ८०० कोटींचा घोटाळा झाल्याचा खळबळजनक आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केला आहे. हाच पैसा निवडणुकीसाठी वापरला जात असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हे गंभीर आरोप करत शिवसेन शिंदे गट तसेच भाजपवर निशाणा साधला.

काय म्हणाले संजय राऊत?

"नाशिक महानगरपालिका हद्दीत नगरविकास खात्या अंतर्गत भुसंपादन घोटाळा आणि त्यातून ८०० कोटींचे गैरव्यवहार झालेत. नाशिकमधल्या आपल्या मर्जीतल्या बिल्डरांना भूसंपादनाच्या नावाखाली ८०० रुपयांची कशी खैरात केली. हे पैसे कोणाकडे गेले? यासंदर्भात मी खुलासा करेन. रितसर तक्रार करतोय.." असे संजय राऊत म्हणाले.

"तसेच नगरविकास खाते हे मुख्यमंत्र्याच्या अगत्याखाली आहे. सर्व महानगरपालिका क्षेत्रात अशा प्रकारचे घोटाळे सुरू आहेत. सध्या राजकारणात येणारा पैसा कोणत्या मार्गाने येतोय. याचा खुलासा करेन. नाशिक महानगरपालिकेत ८०० कोटी गैरमार्गाने गोळा करण्यात आले आहेत. हा पैसा शिवसेना- फडणवीस गटाकडे कसा पोहोचतो आहे, हे पुराव्यासहित २ दिवसात सांगेन.." असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.

Sanjay Raut
Beed Crime: बीडमध्ये तब्बल २ कोटींचे चंदन जप्त; शरद पवार गटाच्या नगरसेवकावर गुन्हा दाखल

तसेच "मुंबईमध्ये एका गुजराती कंपनीने मराठी लोकांनी अर्ज करू नये अशा प्रकारची भूमिका घेतली. या महाराष्ट्रातले सरकार मुख्यमंत्री जे म्हणतात आमची शिवसेना खरी. ही शिवसेना मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी स्थापन झालीय. ती शिवसेना मोदी शहाने याच कारणासाठी तोडली. मराठी माणसाचा आवाज महाराष्ट्रात, मुंबईत राहू नये म्हणून तोडली," अशी टीकाही संजय राऊत यांनी केली.

Sanjay Raut
Rohit Pawar: व्वा दादा व्वा! गुंडच तुमचा खुलेआम प्रचार करतायेत; आमदार रोहित पवारांची खळबळजनक पोस्ट

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com