Beed Crime: बीडमध्ये तब्बल २ कोटींचे चंदन जप्त; शरद पवार गटाच्या नगरसेवकावर गुन्हा दाखल

Beed Crime News: चंदनचोरी प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे केजचे नगरसेवक बालाजी जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
Beed Crime
Beed CrimeSaam Tv

बीड पोलिसांनी केजमध्ये चंदन तस्करीची मोठी कारवाई करत तब्बल 2 कोटींचे चंदन पकडण्यात यश आले आहे. या चंदनचोरी प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे केजचे नगरसेवक बालाजी जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, बीड पोलिसांनी केजमध्ये चंदन तस्करीची मोठी कारवाई केली. या कारवाईमध्ये तब्बल 2 कोटींचे चंदन पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. विशेष म्हणजे या चंदनचोरी प्रकरणात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे केजचे नगरसेवक बालाजी जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धक्कादायक बाब म्हणजे बीड लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या प्रचारात आरोपी नगरसेवक बालाजी जाधव यांचा सक्रिय सहभाग असल्याचे छायाचित्र व्हायरल झाले आहेत. बालाजी जाधव यांच्यावर यापूर्वी बर्दापूर आणि अंबाजोगाई पोलीस ठाण्यात असेच गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.

Beed Crime
Radhika Khera Resign: श्रीराम मंदिराचे दर्शन घेतल्याने पक्षातून विरोध.. काँग्रेसच्या राष्ट्रीय महिला प्रवक्त्याचा तडकाफडकी राजीनामा!

दरम्यान, बालाजी जाधव राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांचे निकटवर्तीय असून ते प्रचारात देखील सक्रीय होते. आता सोशल मिडीयावर बजरंग सोनवणे व बालाजी जाधव यांचे छायाचित्रदेखील व्हायरल होत असल्याने याचीही जोरदार चर्चा होताना दिसत आहे.

Beed Crime
Jalgaon Crime News : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीला झोपेतच संपविले; आरोपी पती ताब्यात

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com