Jalgaon Crime News : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीला झोपेतच संपविले; आरोपी पती ताब्यात

Jalgaon News : दोघांमध्ये किरकोळ कारणावरून नेहमी वाद व्हायचे. इतकेच नाही तर कैलास हा पत्नी भारतबाई हिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला त्रास देत तिच्यासोबत वाद घालायचा
Jalgaon Crime News
Jalgaon Crime NewsSaam tv
Published On

मेहुणबारे (जळगाव) : लग्नानंतर पत्नीच्या चारित्र्यावर पती वारंवार संशय घ्यायचा. यातून पती- पत्नीमध्ये वाद व्हायचे. (Jalgaon) दरम्यान रात्री घरात झोपलेले असताना पतीने याच कारणातून पत्नीच्या डोक्यात दगड टाकून हत्या केल्याची घटना चाळीसगाव (Chalisgaon) तालुक्यातील रोहिणी येथे घडली. या घटनेने खळबळ उडाली असून पोलिसांनी संशयित आरोपी पतीला ताब्यात घेतले आहे. 

Jalgaon Crime News
Heat Wave : उष्णतेची लाट; जळगाव, वर्ध्यात तापमान पोहचले ४४ अंशांवर

चाळीसगाव तालुक्यातील ओझर येथील रहिवासी कैलास गायकवाड हा पत्नी भारताबाई हिच्यासोबत कामानिमित्ताने रोहिणी या गावी राहत होता. दोघांमध्ये किरकोळ कारणावरून नेहमी वाद व्हायचे. इतकेच नाही तर कैलास हा पत्नी भारतबाई हिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला त्रास देत तिच्यासोबत वाद घालायचा. (Crime News) तसेच तिचा छळ करायचा. दरम्यान ५ एप्रिलला रात्री भारताबाई ही पती कैलास गायकवाड व मुलगी योगिता यांच्यासह घरात झोपली होती. यावेळी कैलासने दगड डोक्यात टाकून भारताबाई हीचा खून केला. यानंतर तो फरार झाला होता. 

Jalgaon Crime News
Crop Insurance : पीक विम्याचे तीन लाखांवर अर्ज फेटाळले; शेतकऱ्यांच्या हाती निराशा

पती ताब्यात 

सदर घटनेची माहिती (Police) पोलिसांना देण्यात आली. भारताबाई हिचा भाऊ गणेश माळी याने दिलेल्या तक्रारीवरून ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याचा दरम्यान सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप परदेशी हे रात्रीच्या गस्तीवर होते. रोहिणी गावात त्यांनी नाकाबंदी करुन वाहनांची तपासणी करीत होते. त्याचवेळी काही तरुणांनी त्यांना या खुनाची माहिती दिली. मारेकरी पती चाळीसगावच्या दिशेने पळाल्याचे सांगताच परदेशी यांनी मुलांना गाडीत बसवून मारेकरी कैलास गायकवाड याचा शोध सुरु केला. तसेच चाळीसगाव पोलिसांच्या डी. बी. पथकाची मदत घेत मारेकरी कैलास गायकवाड याला शोधून ताब्यात घेतले. 

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com