Crop Insurance : पीक विम्याचे तीन लाखांवर अर्ज फेटाळले; शेतकऱ्यांच्या हाती निराशा

Yavatmal News : पावसाचा लहरीपणा तसेच बदलणाऱ्या वातावरणाचा फटका पिकांना बसत असतो. यामुळे एक रुपयात पीक विमा योजना सुरु करण्यात आली आहे.
Crop Insurance
Crop InsuranceSaam tv
Published On

संजय राठोड

यवतमाळ : नैसर्गिक संकटाच्या काळात पिकांना संरक्षण कवच आणि शेतकऱ्यांना नुकसानीची मदत मिळावी; यासाठी पीकविमा योजना सुरु झाली आहे. परंतु विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना योजनेचा लाभ उशिराने मिळत असतो. मात्र (Yavatmal) यवतमाळ जिल्ह्यातील तब्बल ३ लाखांवर शेतकऱ्यांचे पीक विमा अर्ज कंपनीकडून फेटाळण्यात आले आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या (Farmer) हाती आता काहीच लागणार नसल्याचे चित्र आहे. 

Crop Insurance
Sambhajinagar Accident : लग्न सोहळ्याहून परत येताना आई-मुलावर काळाचा घाला; टेम्पोची दुचाकीला धडक

पावसाचा लहरीपणा तसेच बदलणाऱ्या वातावरणाचा फटका पिकांना बसत असतो. यामुळे एक रुपयात पीक विमा योजना (Crop Insurance) सुरु करण्यात आली आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना भरपाई मिळत असते. अशाच प्रकारे यवतमाळ जिल्ह्यातील आठ लाख ४४ हजार शेतकऱ्यांनी पाचशे कोटी रुपयांचा पिक विमा उतरविला आहे. यात काही शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान झाल्याने कंपनीकडे अर्ज सादर केले आहेत. 

Crop Insurance
Heat Wave : उष्णतेची लाट; जळगाव, वर्ध्यात तापमान पोहचले ४४ अंशांवर

निम्म्या शेतकऱ्यांचे अर्ज फेटाळले 

प्रत्यक्षात यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर नैसर्गिक प्रकोपाने हल्ला चढविला असताना या काळात विमा उतरविण्याचा प्रत्येक शेतकऱ्याला मदत मिळवण्यासाठी मोठी अपेक्षा होती. मात्र विमा कंपनीने (Crop Insurance Company) त्यांची पार निराशा केली. ६ लाख १० शेतकऱ्यांनी पिकांच्या नुकसानासाठी अर्ज दाखल केले. यातील ३ लाख १० हजार शेतकऱ्यांचे अर्ज विमा कंपनीने फेटाळले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना विमा कंपनीने एक प्रकारे मोठा झटका दिलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com