truck collided with each other 150 goat along with three died in yavatmal
truck collided with each other 150 goat along with three died in yavatmalSaam Digital

यवतमाळ : सायखेडानजीक 2 ट्रकचा भीषण अपघात, 150 बकऱ्यांसह तिघे जागीच ठार

Yavatmal Accident News : या अपघातात अनेक बकऱ्या गंभीर जखमी झाल्या असून घटनास्थळी रक्ताचा सडा पडला आहे. स्थानिक नागरिक अपघातग्रस्तांच्या मदतीला धावले आहेत.

- संजय राठोड

Yavatmal News :

यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा रोड वरील सायखेडा गावा जवळ दोन ट्रकचा समाराेसमाेर भीषण अपघात झाला. या अपघातात दाेन्ही वाहनांचे माेठं नुकसान झाले असून 150 बकऱ्यांसह तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातात अनेक बकऱ्या गंभीर जखमी झाल्या असून घटनास्थळी रक्ताचा सडा पडला आहे. (Maharashtra News)

या अपघाताबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी : सायखेडा गावा जवळ असलेल्या वळणावर हा भीषण अपघात घडला. चंद्रपूर वरून सिमेंट घेवून यवतमाळकडे जाणारा ट्रक आणि यवतमाळ वरून पांढरकवडा मार्गे हैदराबादकडे जात असतानाचा दूसरा ट्रक सायखेडा गावा जवळ असलेल्या वळणावर समोरासमोर धडकले.

truck collided with each other 150 goat along with three died in yavatmal
DJ ban in Buldana : महाराष्ट्रातला हा जिल्हा झाला 'डीजेमुक्त'; बुलडाण्यात थेट बंदी, कारणेही तशी गंभीर

ही धडक इतकी जबरदस्त हाेती की दाेन्ही वाहनांचे माेठं नुकसान झाले. प्राथमिक माहितीनूसार या अपघातात 150 बकऱ्यांसह तीन जण जागीच ठार झाले. या अपघातामुळे यवतमाळ -चंद्रपूर रस्त्यावरील वाहतूक काही वेळेसाठी खोळंबली होती.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

truck collided with each other 150 goat along with three died in yavatmal
Kalyan Constituency: टोमणेवीर जन्माला आलेत; श्रीकांत शिंदेंनी सोडला थेट उद्धव ठाकरेंवर बाण

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com