DJ ban in Buldana : महाराष्ट्रातला हा जिल्हा झाला 'डीजेमुक्त'; बुलडाण्यात थेट बंदी, कारणेही तशी गंभीर

डीजे गाड्यांच्या मॉडिफिकेशन बाबत प्रतिबंध लावण्यासाठी आरटीओ विभागातून सूचना दिल्या गेल्या आहेत. त्यामुळे पोलिस विभाग तसेच आरटीओ विभागाद्वारे आता डीजे धारकांवर कडक वॉच वाचणार आहे.
sound system banned in buldhana orders sp sunil kadasne
sound system banned in buldhana orders sp sunil kadasne Saam Digital

Buldhana :

सध्या लगीनसराई सुरू आहे, लग्न सोहळ्यात अनेकजण डिजे (ध्वनीक्षेपक) लावताना दिसत आहेत. अशातच डीजेच्या वाढत्या आवाजामुळे आरोग्याला धोका निर्माण झाल्याचे दिसत आहे. तर काही ठिकाणी आक्षेपार्ह गाणे वाजवल्यामुळे दंगलसदृश परिस्थिती निर्माण झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे अशा प्रकारच्या घटना रोखण्यासाठी पोलिस विभागाने महत्वाचे पाऊल उचलले आहे. यापुढे बुलढाणा जिल्ह्यात डीजे वाजविण्यावर बंदी करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. (Maharashtra News)

एसपी सुनील कडासणे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन मर्यादेपेक्षा जास्त आवाज असला किंवा परवानगी नसली तर डीजेचे वाहन थेट पोलिस ठाण्यात जमा करण्याचे आदेश पाेलिस कर्मचारी यांना दिल्याचे सांगितले. ते म्हणाले आतापर्यंत २२ डीजे धारकांवर कारवाई करण्यात आली आहे.

sound system banned in buldhana orders sp sunil kadasne
Kalyan Constituency: टोमणेवीर जन्माला आलेत; श्रीकांत शिंदेंनी सोडला थेट उद्धव ठाकरेंवर बाण

एसपी सुनील कडासणे म्हणाले नागरिकांनी कायद्याचे पालन करून आनंद साजरा करावा. मानवी जीवाला कुठल्याही प्रकारचा धोका निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी. अन्यथा कठोर स्वरूपाची कारवाई करण्यात येईल.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

डीजे गाड्यांच्या मॉडिफिकेशन बाबत प्रतिबंध लावण्यासाठी आरटीओ विभागातून सूचना दिल्या गेल्या आहेत. त्यामुळे पोलिस विभाग तसेच आरटीओ विभागाद्वारे आता डीजे धारकांवर कडक वॉच वाचणार आहे. आता यापुढे जिल्ह्यात डीजे वाजविण्यावर जिल्हा प्रशासनाने बंदी घातली आहे तसे पत्र जिल्हाधिकारी यांनी देखील प्रसारित केले आहे.

Edited By : Siddharth Latkar

sound system banned in buldhana orders sp sunil kadasne
Pune Crime News : धक्कादायक! आईच्या मित्राची अल्पवयीन मुलीवर वाईट नजर; घरी कोणी नसताना केलं संतापजनक कृत्य

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com