Pune Crime News : धक्कादायक! आईच्या मित्राची अल्पवयीन मुलीवर वाईट नजर; घरी कोणी नसताना केलं संतापजनक कृत्य

Pune Latest Marathi News : दरम्यान फिर्यादी एका सामाजिक संस्थेत वास्तव्यास असताना तिला त्रास होवू लागला. तिची तपासणी केली असता ती गरोदर असल्याचे निष्पन्न झाले.
lonkinad police arrests three along with mother in minor girl molestation case
lonkinad police arrests three along with mother in minor girl molestation caseSaam Digital

- सचिन जाधव

Pune :

पुणे जिल्ह्यात एका १७ वर्षीय मुलीवर दोघांनी लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. दरम्यान मुलीवर अत्याचार होवूनही तिच्या आईने अत्याचार करणाऱ्याची साथ दिल्याने लाेणीकंद पाेलिसांनी आईसह तिघांवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करत संशयितांना अटक केली आहे. (Maharashtra News)

पाेलिसांकडून मिळालेल्या माहितीनूसार ही घटना मार्च महिन्यात घडली. फिर्यादीने नाेंदविलेल्या तक्रारीत ती एका कापड दुकानात काम करते. तिथे तिची एका व्यक्तीशी ओळख झाली. संबंधित व्यक्तीने लग्नाचे आमिष दाखवून तिच्या साेबत दोन तीन वेळा जबरदस्तीने शारिरीक संबंध प्रस्थापित केले. तसेच स्वतःच्या मोबाईल मध्ये फिर्यादीचे नकाे त्या स्थितीमधील फोटो काढले व ते व्हायरल करण्याची धमकी देवून पुन्हा दोन वेळा जबरदस्तीने शारिरीक संबंध ठेवले.

lonkinad police arrests three along with mother in minor girl molestation case
OBC Bahujan Party: सुप्रिया सुळे,विशाल पाटील वंचित कसे? 'वंचित'च्या पाठिंब्यावर ओबीसी बहुजन पार्टी प्रकाश आंबेडकरांवर नाराज

दरम्यान अन्य एकाने जाे फिर्यादीच्या आईचा मित्र आहे. त्याने देखील एके दिवशी फिर्यादीची आई घरात नसताना जबरदस्तीने तिच्याशी शारीरिक सबंध ठेवले. तिने ही बाब आपल्या आईला सांगितली. परंतु आईने तिलाच धमकी देवून तिच्या मित्राचे नाव कुठेही घ्यायचे नाही असे सुनावले. तसेच पोलिसात तक्रार देऊ नये यासाठी धमकी दिली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान फिर्यादी एका सामाजिक संस्थेत वास्तव्यास असताना तिला त्रास होवू लागला. तिची तपासणी केली असता ती गरोदर असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर तिने स्वतः पोलिसात आपबित्ती सांगितली. लोणीकंद पोलिसांनी अधिक तपास करत तिघांना अटक केली.

Edited By : Siddharth Latkar

lonkinad police arrests three along with mother in minor girl molestation case
Kolhapur Constituency : शाहू महाराज छत्रपतींना एमआयएमचा पाठिंबा, मराठा समन्वयक दिलीप पाटलांचे कोल्हापूरकरांना 'हे' आवाहन

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com