

पुणे शिक्षक-पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी भाजपची तयारी
आमदार रवींद्र चव्हाण यांनी दोन दिवसीय पुणे विभागीय दौरा
पुणे पदवीधर मतदारसंघातील डॉ. स्मिता योगेश जाधव यांच्या प्रचाराचा शुभारंभ
आगामी राज्यातील शिक्षक आणि मतदारसंघाच्या निवडणुकीत मोठ्या घडामोडी होताना दिसत आहेत. या निवडणुकीसाठी भाजपनं मास्टर प्लॅन तयार केला. तर दुसरीकडे बंडखोरांवर थेट कारवाई करत त्यांना पक्षातून बाहेर काढलंय. पुणे विभाग शिक्षक व पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण कामाला लागलेत.
या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चव्हाण दोन दिवसीय पुणे विभागीय दौरा केलाय. या दौऱ्यात भाजप-महायुतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या भव्य संमेलनातून पुणे पदवीधर मतदारसंघातील भाजप-महायुतीच्या उमेदवार डॉ. स्मिता योगेश जाधव आणि पुणे शिक्षक मतदारसंघातील उमेदवार कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराचा भव्य शुभारंभ केलाय.
चव्हाण यांनी दौऱ्यादरम्यान पुणे शहर, पुणे ग्रामीण, सातारा, सांगली, कोल्हापूर व सोलापूर या जिल्ह्यांतील भाजप कोअर कमिटीच्या संघटनात्मक आढावा बैठका घेतल्या. या बैठकांमध्ये आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार नोंदणी मोहिम तीव्र करणे, बूथनिहाय सूक्ष्म नियोजन आणि प्रचार यंत्रणा प्रभावीपणे राबवणे यांबाबत प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना महत्त्वपूर्ण सूचना केल्या.
महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन समन्वय संघाच्या पदाधिकाऱ्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीदरम्यान संघाच्या पदाधिकाऱ्यांनी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना सुरू ठेवण्याबाबत निवेदन दिलं. यावेळी संघाने पुणे विभाग शिक्षक व पदवीधर मतदारसंघातील भाजप-महायुतीच्या दोन्ही उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला.
कोल्हापूर व सोलापूर जिल्ह्यांच्या बैठकीदरम्यान अपक्ष उमेदवार नंदकुमार सागर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेत भाजप-महायुतीला समर्थन जाहीर केलं. तसेच पुणे येथे झालेल्या कार्यकर्ता संमेलनाप्रसंगी भाजप महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीने रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते शरद लाड यांना प्रदेश सचिवपदी नियुक्तीचे पत्र देण्यात आले.
“युवा वर्गाला शिक्षण, करिअर आणि स्टार्टअपच्या माध्यमातून उन्नतीच्या संधी मिळाव्यात, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजप-महायुती सरकार सदैव कटिबद्ध आहे. या कार्याला आणखी गती देण्यासाठी उच्चशिक्षित आणि शिक्षक-पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने कार्यरत असलेले उमेदवार देण्यात आलेत. या उमेदवारांच्या प्रचारासाठी महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी पुढील काही दिवस संपूर्ण ताकदीनिशी काम करावं,” असं आवाहनही चव्हाण यांनी यावेळी केलं.
या बैठकांना केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री जयकुमार गोरे, मंत्री शिवेंद्रराजे भोसले, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, प्रदेश सरचिटणीस आमदार निरंजन डावखरे, प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे यांच्यासह खासदार, आमदार, जिल्हाध्यक्ष, स्थानिक पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.