भाजपच्या तीन नेत्यांची पक्षातून हकालपट्टी; काय आहे कारण? BJPच्या कारवाईनं राजकीय वर्तुळात खळबळ

Bjp action Against Three Leaders: अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत मोठी घडामोड झालीय. भाजपनं आपल्या पक्षातील तीन नेत्यांची थेट हकालपट्टी केलीय. अधिकृत उमेदवाराविरोधात उमेदवारी कायम ठेवल्याने भाजपने ही कारवाई केलीय.
Bjp Expels Three Leaders For Six Years Over Amravati Teachers' Election
Bjp Expels Three Leaders For Six Years Over Amravati Teachers' Electionsaam tv
Published On: 
Summary
  • अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीवरून भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष.

  • चंद्रशेखर भोयर, संगीता शिंदे आणि सुमित पवार यांच्यावर कारवाई

  • तिघांना सहा वर्षांसाठी पक्षातून निष्कासित केल्याचे वृत्त.

अमर घटारे, साम प्रतिनिधी

शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीवरून अमरावतीत महायुतीतील राजकीय संघर्षाला नवे वळण आलंय. अधिकृत उमेदवाराच्या विरोधात दंड थोपटत निवडणुकीच्या रिंगणात उतरणाऱ्या उमेदवारांना भाजपनं पक्षातून बाहेरचा दाखवलाय. भाजपने चंद्रशेखर भोयर, संगीता शिंदे आणि सुमित पवार या बंडखोर नेत्यांवर हकालपट्टीची कारवाई केलीय.

Bjp Expels Three Leaders For Six Years Over Amravati Teachers' Election
नवनियुक्त अध्यक्षांसमोरच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची हाणामारी; पक्ष कार्यालयातच एकमेकांवर भिरकावल्या चपला

भाजप जिल्हाध्यक्ष तथा आमदार प्रताप अडसड यांनी या तिघांना सहा वर्षांसाठी पक्षातून निष्कासित केलंय. या कारवाईमुळे शिक्षक मतदारसंघातील राजकीय घडामोडींना वेग आलाय. दरम्यान संबंधित नेत्यांची अधिकृत प्रतिक्रिया आणि निवडणुकीतील पुढील घडामोडींकडे लक्ष लागले आहे.

Bjp Expels Three Leaders For Six Years Over Amravati Teachers' Election
Deputy Election Commissioner: निवडणूक आयोगात मोठा फेरबदल! IAS प्रकाश राजपुरोहित नवे उप निवडणूक आयुक्त

राज्यातील 5 पैकी दोन मतदारसंघ शिक्षक आमदारांसाठी असून तीन मतदारसंघ हे पदवीधरचे आहेत. अमरावती शिक्षक मतदारसंघात बंडखोर उमदेवारांना पकडून एकूण 26 उमेदवार रिंगणात आहेत. पक्षाचा हुकूम मान्य केलं नसल्यानं भाजपनं आपल्या पक्षातील बंडखोर नेत्यांना थेट पक्षाबाहेरचा रस्ता दाखवलाय. महायुतीचा अधिकृत उमेदवार निश्चित झाल्यानंतरही पक्षाशी संबंधित पदाधिकाऱ्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याने या निवडणुकीकडे लक्ष लागलंय.

महायुतीच्या जागावाटपात अमरावती शिक्षक मतदारसंघाची उमेदवारी शिवसेनेच्या शिंदे गटाचे विद्यमान आमदार किरण सरनाईक यांना जाहीर करण्यात आली होती. मात्र, भाजपशी संबंधित असलेल्या चंद्रशेखर भोयर, संगीता शिंदे आणि सुमित पवार यांनी निवडणुकीत अपक्ष उमेदवारी कायम ठेवली होती, यामुळे पक्षांतर्गत वाद निर्माण झाला होता.

उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी हा वाद मिटेल आणि बंडखोर नेते अर्ज मागे घेतील अशी आशा इतरांना होती होती. परंतु अधिकृत उमेदवाराच्या विरोधात निवडणूक लढवण्याच्या निर्णयामुळे भाजपने तिघांविरोधात शिस्तभंगाची कारवाई केलीय. त्यांच्या पक्षातील सदस्यत्वासह पदेही रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

अमरावती शिक्षक मतदारसंघ महायुतीतून शिवसेना (शिंदे) विद्यमान आमदार किरण सरनाईक यांना शिवसेनेनं उमेदवारी दिलीय. तर, काँग्रेसकडून अदिती ऋषिकेश पोहरे यांना उमेदवारी देण्यात आलीय. तर शिवसेना ठाकरे गटाकडून दत्तात्रय लहाने हे अधिकृत उमेदवार आहेत. यामुळे येथील मतदारसंघात तिहेरी लढत होईल अशी मानली जाते. महायुतीकडून शिवसेना उमेदवार किरण सरनाईक हे आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com