Dattatray Gade New Photo : स्वारगेट अत्याचार घटना; कपाळावर टिळा, बारीक दाढी, आरोपी दत्ता गाडेचे नवीन फोटो व्हायरल

Dattatray Gade New Photo Viral : स्वारगेट अत्याचार प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. म्हणजे आरोपी दत्तात्रय गाडेचे नवीन फोटो समोर आले आहेत.
Dattatray Gade New Photo Viral
Dattatray Gade New Photo ViralSaam Tv News
Published On

पुणे : पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली. पुण्यातील स्वारगेट बस डेपोत एका २६ वर्षीय तरुणीवर बसमधे बलात्कार झाल्याची घटना समोर आली. २६ वर्षीय तरुणीवर पहाटे स्वारगेट एसटी डेपोमध्ये उभ्या असलेल्या बसमध्ये बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. पोलिसांची पथके आरोपीच्या मागावर आहेत. दरम्यान, आता मोठी अपडेट समोर आली आहे, ती म्हणजे आरोपी दत्तात्रय गाडेचे नवीन फोटो समोर आले आहेत.

Dattatray Gade New Photo Viral
Dattatray Gade New Photo ViralSaam TV News

पुण्यातील स्वारगेट बस डेपोमध्ये पहाटे ५.३० वाजता ही धक्कादायक घटना घडली. २६ वर्षीय तरुणी काल पहाटे पुण्याहून फलटणला निघाली होती. त्या दरम्यान बस डेपोमध्ये ही घटना घडली. गुन्हा घडल्यावर नराधम आरोपी दत्तात्रय गाडे हा फरार झाला असून त्याचा शोध घेतला जातोय. आता त्याचे दोन नवीन फोटो समोर आले आहेत.

Dattatray Gade New Photo Viral
दत्तात्रयनं पीडितेला आत जायला सांगितलं, अंधार असल्यामुळे तिने टॉर्च लावून चेक केलं; तेवढ्यात नराधमाने...

बस डेपोत पीडित तरुणीला चुकीची माहिती देऊन डेपोत थांबलेल्या शिवशाही बसमध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आला. स्वारगेट बस डेपोत ही घटना पहाटे साडे पाचच्या सुमारास घडली आहे. हा आरोपी रेकॉर्डवरील असला तरी स्वारगेटला इतक्या गाड्या असताना ही घटना कुणालाच कशी कळली नाही हा प्रश्न आहे. यामुळं स्वारगेट बस डेपोतील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आरोपीला शोधण्यासाठी पथकं रवाना झाली आहेत.

Dattatray Gade New Photo Viral
Swargate Shivshahi Bus : शिवशाही बसचा दरवाजा लॉक, तरीही 'तो' उघडला कसा? प्राथमिक चौकशीत मोठी माहिती समोर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com