Pune Swargate Bus Depot Case
Pune Swargate Bus Depot CaseSaam Tv News

दत्तात्रयनं पीडितेला आत जायला सांगितलं, अंधार असल्यामुळे तिने टॉर्च लावून चेक केलं; तेवढ्यात नराधमाने...

Swargate Bus Depot : आरोपी दत्तात्रय गाडे याने पीडित तरुणीला बसच्या आत जायला सांगितलं. बसमध्ये अंधार होता म्हणून तरुणीनं टॉर्च लावून चेक करत होती.
Published on

पुणे : पुण्यातील स्वारगेट बस डेपोमध्ये एका २६ वर्षीय तरुणीला धमकावून शिवशाही बसमध्ये नेत तिच्यावर बलात्कार करणारा दत्तात्रय गाडे सध्या फरार आहे. या घटनेमुळं अख्ख्या राज्यात संतापाची तीव्र लाट पसरलीय. पुण्यात स्वारगेट डेपोच्या परिसरात विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी आंदोलने केली. डेपो परिसरात पोलिसांचा बंदोबस्त आहे. आरोपी दत्तात्रय गाडे याला अटक करण्याची मागणी होत आहे. गाडे फरार आहे. पण त्याला शोधण्यात पोलिसांना अपयश येत आहे, यावरून पोलीस यंत्रणा आणि सरकारवरही टीका होतेय.

दरम्यान, आरोपी दत्तात्रय गाडे याने पीडित तरुणीला बसच्या आत जायला सांगितलं. बसमध्ये अंधार होता म्हणून तरुणीनं टॉर्च लावून चेक करत होती. तेवढ्यात तो मागून आला आणि त्याने बसचा दरवाजा बंद केला आणि तरुणीवर बलात्कार केला. दरम्यान, दत्तात्रय गाडे कुठे गेला, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्याचवेळी त्याला शोधण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न सुरू केले आहेत. आरोपी शिरूर तालुक्यातील गुणाट येथे लपल्याचा संशय असून, त्याचा ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून शोध घेतला जात आहे.

Pune Swargate Bus Depot Case
Pune Crime : स्वारगेटनंतर आणखी एक धक्कादायक घटना, सॉफ्टवेअर इंजिनियर तरूणीला पाहून ड्रायव्हरचं नको ते कृत्य

दत्तात्रय गाडे हा ऊसामध्ये लपून बसल्याची माहिती खबऱ्यांकडून पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलीस तात्काळ ॲक्टिव्ह झाले असून, पुणे शहर पोलिसांकडून ड्रोनद्वारे ऊसाच्या शेतात शोध घेण्यात येत आहे. याच ठिकाणी असलेल्या घरात आरोपी दत्तात्रय गाडे हा पाणी पिण्यासाठी आल्याची माहिती आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या विविध पथकांकडून त्याचा शोध सुरू आहे. गाडे याच्यावर यापूर्वी शिक्रापूर या ठिकाणी २ गुन्हे, तर शिरूर, कोतवाली, सुपा आणि स्वारगेट असे एकूण ६ गुन्हे दाखल आहेत. आरोपीने घटना घडल्यानंतर थेट त्याचे गाव शिरूर गाठलं होतं.

Pune Swargate Bus Depot Case
Pune Police : मारहाण केल्याप्रकरणी पोलिस कर्मचाऱ्याचे निलंबन; पुणे पोलिस दलात खळबळ, भाऊ- बहिणीवरही गुन्हा दाखल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com