
पुणे : स्वारगेट बसस्थानकात बुधवारी पहाटे २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्यानंतर हा प्रकार नेमका कसा घडला, याचा शोध घेतला जात आहे. या प्रकरणातील महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्या शिवशाही बसमध्ये ही घटना घडली, तिचा दरवाजा लॉक असूनही तो उघडला कसा? याच्याबाबत तांत्रिक तपासणी सुरू करण्यात आली आहे. गाडीचा एअर प्रेशर कमी झाल्याने दरवाजा आपोआप उघडला असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. अशी माहिती प्राथमिक चौकशीत समोर आली आहे.
घटनास्थळी चौकशी करताना पोलिसांना बस चालकाने माहिती दिली की, त्याने गाडी लॉक केली होती. मात्र, बस आगारात आल्यानंतर गाडी बंद असताना एअर प्रेशर कमी झाल्याने दरवाजा उघडला असावा. तांत्रिक विभागातील कर्मचाऱ्यांनीही याची शक्यता व्यक्त केली आहे. शिवशाही बसमध्ये सेफ्टी लॉक असतो. मात्र, गाडी बंद असताना आणि एअर प्रेशर उतरल्यास लॉक केलेला दरवाजा उघडण्याची शक्यता असते.
या घटनेनंतर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून सर्व शिवशाही बसगाड्यांची तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. स्वारगेट बसस्थानकातील सुरक्षेच्या उपाययोजना देखील वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, पुणे पोलिसांची १०० जणांची तुकडी पुण्याच्या गुनाट गावात दाखल झालीय. पुरुष आणि महिला पोलिसांची तुकडी दत्तात्रय गाडेच्या शोध मोहीमेसाठी सज्ज झालेत. काही वेळात ही शोध मोहिम सुरु होईल. त्याच्या भावाला चौकशीसाठी ताब्यात घेतले असून, आरोपीच्या हालचालींवर बारकाईने नजर ठेवली जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.