काळजाचा ठोका चुकवणारा अपघात! पुणे–सातारा महामार्गावर डंपरनं ४-५ वाहनांना उडवलं

Dumper Rams Multiple Vehicles Near Katraj Tunnel Pune: पुणे–सातारा महामार्गावरील कात्रज जांभुळवाडी बोगदाजवळ डंपरने चार ते पाच वाहनांना जोरदार धडक दिली. अपघातानंतर डंपरने पेट घेतल्याने मोठी खळबळ उडाली असून चार ते पाच जण जखमी झाले आहेत.
Damaged vehicles after a dumper rammed into multiple cars near Jambhulwadi Tunnel on Pune–Satara Highway.
Damaged vehicles after a dumper rammed into multiple cars near Jambhulwadi Tunnel on Pune–Satara Highway.SaamTv
Published On

सचिन जाधव, साम टीव्ही

पुणे: राज्यामध्ये ठिकठिकाणी रोजच अपघाताची मालिका सुरूच आहे. सातारा-पुणे महामार्गावर भीषण अपघात झाला असून यामध्ये पाच ते सहा वाहन एकमेकांना धडकले आहे. या अपघातात तीन ते चार जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाली आहेत. जखमीना उपचारासाठी रुग्णालायत दाखल केले जात आहे.

Damaged vehicles after a dumper rammed into multiple cars near Jambhulwadi Tunnel on Pune–Satara Highway.
Navi Mumbai: पाढे पाठ नसल्याने दिली भयंकर शिक्षा, शिक्षिकेने विद्यार्थिनीला उलाथन्याने दिले ४० फटके

दरम्यान पुणे बंगळूर महामार्गावर एका डंपरने चार ते पाच वाहनांना धडक दिल्याने मोठा अपघात झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-बंगळूर महामार्गावर कात्रज येथील जांभुळवाडी बोगदाजवळ एका डंपरने चार ते पाच वाहनांना मागच्या बाजूनेजोरदार धडक दिली आणि पुढे जाऊन डंपरने पेट घेतला. यामध्ये काहीवेळातच डंपर जळून पूर्णपणे खाक झाला. मात्र डंपरने वाहनांना धडक दिल्याने आतमध्ये बसलेले चार ते पाच जण जखमी झाले आहे. यामध्ये वाहनांचे मोठे नुकसान झाले असून पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आहेत.

Damaged vehicles after a dumper rammed into multiple cars near Jambhulwadi Tunnel on Pune–Satara Highway.
पुण्यातील संतापजनक घटना! लॉजवर न्यायचं होतं, पण डोंगरवर नेलं; देहविक्री करणाऱ्या महिलेसोबत ६ जणांचं भयंकर कृत्य

जांभूळवाडी बोगदा, नवले ब्रिज आणि वडगाव ब्रिज या ठिकाणी नेहमची अपघात सत्र सुरूच असतात. यामध्ये अनेक जणांनी आपले प्राण गमवले आहे. काही दिवसांपूर्वीच नवले ब्रीजवर एका चार चाकी वाहनाला कंटेनरने धडक दिल्याने सात जणांचा मृत्यू झाला होता. मागच्या काही दिवसांपासून या महामार्गावर किरकोळ अपघात तर रोजच होत आहे. भीषण अपघाताने अनेकांचे जीव गेले असून प्रशासन कुठलेही ठोस पाऊल उचलत नसल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com