prasad lad news
prasad ladSaam tv

Prasad Lad News : बीड पुन्हा चर्चेत; भाजप आमदाराचा AI आवाज आणि बोगस सही वापरून तीन कोटी लाटले

Prasad Lad latest News : बीड जिल्हा पुन्हा चर्चेत आला आहे. भाजप आमदाराचा AI आवाज आणि बोगस सही वापरून तीन कोटींची लाटल्याचा प्रकार समोर आला आहे.
Published on

भाजप आमदार प्रसाद लाड यांचं नाव आणि एआय आवाजाचा गैरवापर करून बीड जिल्ह्यात ३ कोटी २० लाखांचा निधी हडपल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. रत्नागिरीतील अधिकाऱ्यांना आमदार लाड यांच्या बनावट लेटरहेडवर खोटी सही आणि एआय आवाजाचा वापर करून कोट्यवधींची निधी वळवण्यात आलाय. ही बाब लाड यांनी स्वत: विधान परिषद सभागृहात सांगितल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली.

prasad lad news
Maharashtra Politics : काँग्रेसची पिढी संघर्ष करायला तयार नाही, संजय राऊतांच्या टीकेला भाजपमध्ये गेलेल्या कुणाल पाटलांनी काय प्रत्युत्तर दिलं?

रत्नागिरी येथील एका अधिकाऱ्याला एआय निर्मित कॉल आला होता. प्रसाद लाड यांच्या आवाजात अधिकाऱ्याला निधी वर्ग करण्याचे आदेश देण्यात आले. यावेळी लाड यांचे बनावट लेटरहेड आणि खोट्या सहीचा वापर करण्यात आला. एकूण ३ कोटी २० लाख रुपये वर्ग बीड जिल्ह्यात वर्ग करण्यात आले.

prasad lad news
GST Council Meeting : दूध ते कपडे; दैनंदिन जीवनात लागणाऱ्या आवश्यक वस्तू स्वस्त होणार; सरकारचं सर्वसामान्यांना मोठं गिफ्ट

बीड जिल्हा पुन्हा चर्चेत

बीड जिल्हा गेल्या वर्षभरातून चर्चेत आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या ते अनेक घोटाळ्यांपासून अनेक प्रकरणांनी जिल्ह्याचं नाव चर्चेत आलं आहे. आता आमदाराच्या नावाचा गैरवापर झाल्यानंतर चर्चेत आलं आहे. या प्रकरणी ४ जणांची नावे समोर आली आहेत. तसेच यात बंडू नावाच्या सरपंचाही समावेश असल्याची माहिती मिळाली आहे.

prasad lad news
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुखांच्या हत्येआधी वाल्मिक कराडने कोणाला फोन केला होता? धक्कादायक माहिती समोर

या गैरवापरानंतर आमदार प्रसाद लाड यांनी तीव्र नाराजी व्यक्त केलीये. 'माझ्या नावाचा आणि आवाजाचा गैरवापर करून घोटाळा करण्यात आलाय. बनावट लेटरहेड आणि सहीचा वापर करून निधी चोरण्याचं कृत्य गंभीर आहे, असं लाड यांनी सभागृहात सांगितलं. या घोटाळ्याप्रकरणी प्रसाद लाड यांनी सायन पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तसेच त्यांनी पोलीस आयुक्त आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही माहिती दिली आहे. 'बीडचे नाव ऐकताच अधिक सावध झाल्याचेही लाड यांनी नमूद केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com