प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंनी सुनेत्रा पवारांसह प्रवास टाळला, मुख्यमंत्र्यांसोबत आले

Praful Patel, Sunil Tatkare : प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी आसाम दौऱ्यावरून परतताना सुनेत्रा पवारांसोबत प्रवास टाळल्याची चर्चा रंगली आहे. त्यानंतर तटकरे यांनी शरद पवारांची भेट घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत वादाच्या चर्चांना उधाण आले आहे.
Maharashtra Politics:
Sunil Tatkare On Praful Patel Saam TV Marathi News
Published On

Praful Patel and Sunil Tatkare Latest News Update : मागील दोन दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील अंतर्गत वाद समोर येत आहेत. पक्षाने आयोगाला दिलेल्या यादीत प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, भुजबळ यांची नावे गायब असल्याचे समोर आले होते. त्यानंतर आता आसाम दौऱ्याहून माघारी परतताना तटकरे-पटेल यांनी सुनेत्रा पवार यांच्यासोबतचा प्रवास टाळला. ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत विमानाने आले. या अचानक झालेल्या बदलामुळे महायुतीमध्ये अंतर्गत धुसफूस सुरू आहे का, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

त्यामुळेच आसाम दौऱ्यावरून परतताना राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये काहीतरी बिनसल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी सुनेत्रा पवार यांच्यासोबत प्रवास करणे टाळल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आसामहून परतताना पटेल आणि तटकरे या दोन्ही नेत्यांनी सुनेत्रा पवारांऐवजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत प्रवास करण्याला पसंती दिली.

Maharashtra Politics:
Bird Flu : सावधान! बर्ड फ्लूचा विळखा अधिकच घट्ट; ४ लाख कोंबड्या आणि लाखो अंडी नष्ट, प्रशासनाचा मोठा निर्णय

सुनील तटकरे यांनी घेतली शरद पवारांची भेट

या प्रवासातील बदलानंतर दुसरी महत्त्वाची घडामोडी म्हणजे सुनील तटकरे यांनी काल रात्री उशिरा ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. आसामधून राज्यात परतल्यानंतर तटकरे यांनी शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर या भेटीमुळे राजकीय तर्कवितर्कांना अधिकच वेग आला.

Maharashtra Politics:
Prateek Yadav : अखिलेश यादव यांच्या धाकट्या भावाचे निधन; वयाच्या ३८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, नेमकं कारण अस्पष्ट

तटकरे यांनी काय स्पष्टीकरण दिले?

या भेटीवर बोलताना सुनील तटकरे म्हणाले की, शरद पवार यांनी सहा दशके देशाच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली दीर्घकाळ काम केले आहे. त्यामुळे केवळ त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी ही सदिच्छा भेट होती . या भेटीमागे कोणताही राजकीय हेतू नसून आम्ही आजही अजित दादांच्या नेतृत्वाखाली एनडीए मजबूत करण्यासाठी कटिबद्ध आहोत, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.

Maharashtra Politics:
Maharashtra Heatwave : धक्कादायक! फुले तोडण्यासाठी शेतात गेल्या, उष्माघाताने ३५ वर्षाच्या महिलेचा मृत्यू; सोलापूरधील दुर्दैवी घटना

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com