Bird flu outbreak in Nandurbar Maharashtra : नंदूरबार जिल्ह्यातील नवापूर परिसरात बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव वाढत असून परिस्थिती अधिक गंभीर होत चालली आहे. आतापर्यंत सहा पोल्ट्री फार्ममधील नमुने पॉझिटिव्ह आल्याने प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणावर 'कलिंग' ऑपरेशन (पक्षी नष्ट करण्याची मोहीम) सुरू करण्यात आले आहे. या मोहिमेत आतापर्यंत तब्बल ३ लाख ८९ हजार कोंबड्यांचे कलिंग करण्यात आले आहे. तर २१ लाख ६१ हजार अंडी आणि ५० टन पक्षी खाद्य नष्ट करण्यात आले आहे.
नवापूर तालुक्यातील एकूण ३५ पैकी १४ पोल्ट्री फार्ममध्ये प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. इतर फार्मचे नमुने भोपाळ येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. नवापूरसह जिल्ह्यातील इतर पोल्ट्री फार्ममधूनही नमुने घेतले जात असून, पुढील अहवालांनुसार कलिंग ऑपरेशनची व्याप्ती वाढण्याची शक्यता पशुसंवर्धन विभागाने व्यक्त केली आहे. बर्ड फ्लूमुळे पोल्ट्री व्यावसायिक मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले असून परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
नंदूरबारमधील नावपूरमध्ये पोल्ट्री फार्ममध्ये बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने परिस्थिती अधिक गंभीर झाली. आतापर्यंत जवळपास ४ लाख कोंबड्या मारण्यात आल्या आहेत. तर लाखो अंडी नष्ट केली आहेत. काही पोल्ट्री फॉर्ममधील नमुने तपासण्यासाठी पाठवले आहेत. पुढील अहवालानुसार आणखी कलिंग ऑपरेशन वाढण्याची शक्यता पशुसंवर्धन विभागाने व्यक्त केली आहे. बर्ड फ्लूमुळे पोल्ट्री व्यवसायिकांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत आहेच. पण त्याशिवाय परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.