

PM Modi latest news : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या सुरक्षेसाठी वापरल्या जाणाऱ्या गाड्यांच्या ताफ्यात (Convoy) महत्त्वाचे बदल केले आहेत. इंधनाची बचत करण्याचे आवाहन मोदींनी केले होते. त्यानंतर मोदी यांनी तात्काळ आपल्या ताफ्यातील गाड्यांची संख्या कमी करण्याचे आदेश दिले आहेत. मोदींच्या या निर्णायाचे देशभरात कौतुक होत आहे. महाराष्ट्र, उत्तर प्रदेशसह अनेक राज्यातील मंत्र्यांनी आपल्या ताफ्यातील कार कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ताफ्यातील गाड्यांची संख्या कमी केल्याची माहिती समोर आली आहे. नुकत्याच झालेल्या गुजरात आणि आसाम दौऱ्यात याची अंमलबजावणी करण्यात आली. पंतप्रधान मोदींच्या ताफ्यातील गाड्यांची संख्या कमी केली असली तरी, 'एसपीजी' (SPG) या सुरक्षा यंत्रणेच्या नियमांनुसार लागणारी सर्व सुरक्षा कायम ठेवण्यात आली आहे.
प्रदूषणाचे भान ठेवून ताफ्यात शक्य तिथे इलेक्ट्रिक गाड्या (E-Vehicles) वापरण्याचे आदेश मोदींनी दिले आहेत. इलेक्ट्रिक गाड्या वापरायच्या असल्या तरी त्यासाठी नवीन खर्च करून नवीन गाड्या विकत घेऊ नका, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. सरकारी तिजोरीवरील भार कमी करणे हा यामागचा उद्देश आहे. मोदींच्या या निर्णयानंतर आता दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता, राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनीही आपल्या ताफ्यातील गाड्यांची संख्या कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.
आखाती देशात युद्धाचा भडका काही थांबलेला नाही, पुढील काही दिवसांत आणखी तणाव वाढण्याची शक्यता आहे. या तणावामुळे जगभरातील अर्थव्यवस्था अडचणीत आल्या आहेत. भारताकडूनही उपाययोजना सुरू कऱण्यात आल्या आहेत. स्वदेशी मंत्राचा वापर करण्याचा सल्ला दिलाय. पेट्रोल-डिझेलची बचत करण्याचा सल्ला मोदींनी दिला होता. त्याशिवाय शक्य तिथे वर्क फ्रॉम होम.. यासारख्या उपाययोजनाची चर्चा सुरू आहे. त्याआधीच मोदींकडून आपल्या ताफ्यातील अनावश्यक कार न ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.