Baramati plane crash : बारामतीत पुन्हा एक विमान अपघात

Baramati training aircraft crash news : बारामतीतील गोजुबावी परिसरात शिकाऊ विमान कोसळल्याची घटना घडली. रेडबर्ड कंपनीचे हे विमान सराव उड्डाणादरम्यान कोसळल्याची माहती समोर आली.
Baramati plane crash
A Redbird training aircraft crashed near Gojubavi in Baramati during a practice flight, while both trainee pilots survived safely.Saam TV Marathi
Published On

सागर आव्हाड, पुणे प्रतिनिधी

Pune Baramati Gojubavi plane crash Latest News Update : पुण्यातील बारामतीमध्ये पुन्हा एक विमान कोसळल्याची कोसळल्याची खळबळजनक घटना घडली आहे. शिकाऊ विमान कोसळल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सुदैवाने, या अपघातात विमानाचा पायलट सुरक्षित असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. बारामती परिसरात गेल्या काही महिन्यांत विमान कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

ज्या ठिकाणी आज हा अपघात झाला, त्याच गोजुबावी परिसरात काही काळापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेही विमान कोसळले होते. त्याच भागात आता हा दुसरा अपघात झाल्याने या परिसरातील भौगोलिक स्थिती किंवा तांत्रिक कारणांबाबत चर्चा सुरू झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नेहमीप्रमाणे सरावासाठी उड्डाण केलेले हे विमान तांत्रिक बिघाडामुळे जमिनीवर कोसळले. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि संबंधित विमान प्रशिक्षण संस्थेचे अधिकारी घटनास्थळी रवाना झाले आहेत. विमानाचे किरकोळ नुकसान झाले असून, पायलटने प्रसंगावधान राखल्यामुळे मोठी जीवितहानी टळली आहे.

Baramati plane crash
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर खंडाळा घाट उतरताना मिनी बस उलटली, मंकी हिल परिसरात अपघात

बारामतीमध्ये कोसळलेले विमान हे एका खासगी कंपनीचे होते. बारामती मध्ये अनेक वैमानिक प्रशिक्षण देणाऱ्या संस्था कार्यरत आहेत. यातील एका कंपनीचे हे विमान होते अशी माहिती समोर आली आहे. विमानतळावर असलेल्या धावपट्टी जवळील गोजुबावी या गावाजवळ ही घटना घडली आहे. या विमानात २ शिकाऊ वैमानिक असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. दोघेही जण सुरक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे.

Baramati plane crash
मोठी बातमी! Ola, Uber आणि Rapido ला मोठा दणका! अनधिकृत बाईक टॅक्सींवर बंदी; सरकारची कठोर भूमिका

मिळालेल्या माहितीनुसार, रेडबर्ड कंपनीच्या या विमानाने सरावासाठी उड्डाण केले होते. मात्र, गोजुबावी परिसरातील शेतात हे विमान अचानक कोसळले. विमानाचा आवाज येताच स्थानिक ग्रामस्थांनी मदतीसाठी धाव घेतली. प्राथमिक माहितीनुसार, पायलटने प्रसंगावधान राखल्यामुळे त्याचे प्राण वाचले आहेत. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून पंचनाम्याचे काम सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com