Maharashtra politics : राष्ट्रवादीत 'भूकंप'; पटेल-तटकऱ्यांची पदे कापली? पार्थ आणि जय पवारांची एन्ट्री, सुनेत्रा पवारांचे स्पष्टीकरण

NCP political crisis : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नव्या कार्यकारिणी यादीमुळे राजकीय खळबळ उडाली आहे. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या पदांचा उल्लेख नाही, त्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली.
praful patel
ncp sunetra pawarsaam tv
Published On

Sunil Tatkare Praful Patel removed from NCP committee : अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 'नाराजी नाट्य' रंगण्याची चिन्हे आहेत. राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला २२ पदाधिकाऱ्यांची नवीन यादी केली आहे, त्यावरून पक्षात अंतर्गत वाद निर्माण झाला आहे. या यादीत ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या नावांपुढे त्यांच्या पदांचा उल्लेख टाळण्यात आल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. (Sunil Tatkare Praful Patel)

नेमका वाद काय?

राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय निवडणुकीनंतर सुनेत्रा पवार यांची 'राष्ट्रीय अध्यक्ष' म्हणून निवड झाली होती. तेव्हा प्रफुल्ल पटेल यांना 'राष्ट्रीय कार्याध्यक्ष' आणि सुनील तटकरे यांना 'प्रदेशाध्यक्ष' ही महत्त्वाची पदे देण्यात आली होती. मात्र, निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रात प्रफुल्ल पटेल यांच्या नावापुढे केवळ 'राज्यसभा खासदार' असा उल्लेख आहे. सुनील तटकरे यांच्या नावापुढे केवळ 'लोकसभा खासदार' असे लिहिण्यात आले आहे.

दुसरीकडे, अजित पवार यांच्या मुलांच्या नावापुढे मात्र त्यांच्या पदांचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. पार्थ पवार, जनरल सेक्रेटरी (सरचिटणीस) आणि जय पवार यांच्या नावापुढे राष्ट्रीय सचिव असा उल्लेख आहे.

ज्येष्ठ नेत्यांना डावलले?

पक्षातील इतर पदाधिकाऱ्यांच्या नावापुढे त्यांच्या पदांचा उल्लेख असताना, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांसारख्या ज्येष्ठ नेत्यांच्या बाबतीत असे का घडले? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दोघांकडेही पक्षाची अत्यंत महत्त्वाची पदे असतानाही त्यांना केवळ 'खासदार' म्हणून दर्शवणे, हे त्यांना पदावरून हटवल्याचे संकेत आहेत की केवळ तांत्रिक चूक, यावर आता कुजबुज सुरू झाली आहे.

praful patel
Maharashtra politics : अजित पवारांच्या राष्ट्रवादीत भूकंप; पटेल, तटकरे अन् भुजबळांना डच्चू? कार्यकारिणीच्या नव्या यादीने खळबळ

'ही केवळ तांत्रिक चूक'; सुनेत्रा पवारांचे स्पष्टीकरण Sunetra Pawar On NCP National Executive List

यादीमुळे निर्माण झालेल्या गोंधळानंतर सुनेत्रा पवार यांनी तात्काळ भूमिका स्पष्ट केली. "यादीत काही जणांची नावे नसणे ही केवळ एक तांत्रिक चूक (Technical Error) आहे. त्यामध्ये लवकरच सुधारणा केली जाईल," असे त्यांनी सांगितले. निवडणूक आयोगाला लवकरच सुधारित यादी सादर केली जाईल, अशी माहितीही त्यांनी दिली. सुनेत्रा पवार यांच्या स्पष्टीकरणामुळे सध्यातरी वादावर पडदा पडला असला, तरी या 'तांत्रिक चुकी'मुळे राजकीय खळबळ उडाली आहे.

praful patel
Maharashtra Government : पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर महाराष्ट्र सरकारनं घेतले ३ मोठे निर्णय, अधिकार्‍यांच्या दौऱ्यावर बंदी अन्...

अंतर्गत नाराजी चव्हाट्यावर

पक्षात गेल्या काही दिवसांपासून या ज्येष्ठ नेत्यांच्या भूमिकेवरून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. अजित पवार यांच्या संदर्भातील मुद्द्यांवर हे नेते गांभीर्याने भूमिका मांडतात का? अशी विचारणाही पक्षांतर्गत काही नेत्यांकडून होत होती. त्यातच आता निवडणूक आयोगाच्या यादीत त्यांची पदे नमूद न केल्यामुळे ही अंतर्गत नाराजी अधिक स्पष्टपणे समोर आली आहे. अधिकृत यादीत पदांचा उल्लेख नसल्याने, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेमकं चाललंय काय? अशी चर्चा सुरू झाली आहे. या यादीमुळे पक्षात दोन गट पडण्याची किंवा मोठे वाद उफाळून येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

praful patel
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना ₹३००० एकत्र मिळणार; लाभार्थी महिलांचा आकडा आला समोर, वाचा अपडेट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com