Maharashtra politics : अजित पवारांच्या राष्ट्रवादीत भूकंप; पटेल, तटकरे अन् भुजबळांना डच्चू? कार्यकारिणीच्या नव्या यादीने खळबळ

NCP political crisis : अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवीन राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ आणि सुनील तटकरे यांची नावे यादीत नसल्याने पक्षातील अंतर्गत कलहाची चर्चा रंगली आहे.
Sunetra Pawar NCP: सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीत पडले दोन गट?
NCP Rowsaam tv
Published On

Praful Patel removed from NCP committee : राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) राष्ट्रीय कार्यकारिणीची नवीन यादी समोर आली असून, यामध्ये अनेक धक्कादायक बदल पाहायला मिळत आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाला सादर करण्यात आलेल्या या यादीतून पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांचे नाव वगळण्यात आले आहे. तसेच सुनील तटकरे, छगन भुजबळ आणि दिलीप वळसे-पाटील या दिग्गज नेत्यांनाही कार्यकारिणीत स्थान मिळालेले नाही. या घडामोडीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आल्याची चर्चा सुरू झाली आहे.

राष्ट्रवादीकडून राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची ही यादी केंद्रीय निवडणूक आयोगाला सुपूर्द करण्यात आली. आयोगाला दिलेल्या या यादीतून पटेलांना वगळले आहे का? अशी चर्चा आता रंगली आहे, कारण त्यांच्या नावासमोर तसा कोणताही उल्लेख दिसत नाही. विशेष म्हणजे, जय पवार यांना राष्ट्रीय कार्यकारिणीत स्थान मिळाले आहे; मात्र प्रफुल्ल पटेलच नव्हे, तर सुनील तटकरे, छगन भुजबळ आणि वळसे-पाटील यांनाही स्थान मिळालेले नाही. यादीवरून निर्माण झालेला वाद आणि चर्चा पाहता सुनेत्रा पवार यांनी तात्काळ भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी म्हटले की, "प्रसारमाध्यमांमध्ये प्रसारित होत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या यादीत तांत्रिक चूक झाली आहे. ही चूक लवकरच दुरुस्त केली जाईल."

Sunetra Pawar NCP: सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीत पडले दोन गट?
सरकारचा नवा नियम, ...तर LPG गॅस सिलिंडरचे अनुदान बंद होणार, हजारो कनेक्शनही तोडणार

या नवीन कार्यकारिणीत अजित पवारांच्या मुलांकडे महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पार्थ पवार यांची जनरल सेक्रेटरी (सरचिटणीस) पदी, तर जय पवार यांची नॅशनल सेक्रेटरी (राष्ट्रीय सचिव) पदी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादीच्या या नव्या यादीत सुबोध मोहिते, सना मलिक, अविनाश आदिक, धीरज शर्मा, अभिषेक बोके, संजय प्रजापती, धनंजय शर्मा, राणा रणवीर सिंग आणि डॉ. रमण प्रीत सिंग यांच्या नावांचा समावेश आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सोपवण्यात आलेल्या या कार्यकारिणीमुळे अजित पवार गटासह राज्याच्या राजकारणातही मोठी खळबळ उडाली आहे.

Sunetra Pawar NCP: सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीत पडले दोन गट?
महाराष्ट्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय! जुलैपासून लागू होणार 'लँड टायटलिंग ॲक्ट'; आता प्रत्येक फ्लॅटचे मिळणार 'मालमत्ता कार्ड'

राष्ट्रवादीच्या या नव्या यादीतील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे अनुभवी नेत्यांना मिळालेला डच्चू. गेल्या अनेक वर्षांपासून पक्षाचा राष्ट्रीय चेहरा राहिलेल्या पटेल यांना कार्यकारिणीतून वगळल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. फक्त पटेलच नव्हे, तर महाराष्ट्रातील पक्षाचे एकमेव लोकसभा खासदार सुनील तटकरे यांचेही नाव सरचिटणीस पदावरून वगळण्यात आल्याचे समोर आले आहे. त्याचसोबत छगन भुजबळ, हसन मुश्रीफ आणि दिलीप वळसे-पाटील यांसारख्या दिग्गज नेत्यांची नावेही नवीन यादीतून गायब असल्याने, पक्षाने आपली जुनी फळी पूर्णपणे बाजूला केल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.

Sunetra Pawar NCP: सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीत पडले दोन गट?
Extramarital Affair : धक्कादायक! प्रियकरासाठी पत्नी झाली वैरी; एका फोनवर नवऱ्याला दिला विजेचा शॉक

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com