Extramarital Affair : धक्कादायक! प्रियकरासाठी पत्नी झाली वैरी; एका फोनवर नवऱ्याला दिला विजेचा शॉक

Maharashtra crime news : कळंब तालुक्यातील पंगडी येथे पत्नीने प्रियकराच्या सांगण्यावरून गाढ झोपलेल्या पतीला विजेचा शॉक देऊन ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
Extramarital Affair
Extramarital Affairsaam tv
Published On

संजय राठोड, यवतमाळ । साम टीव्ही

अनैतिक संबंधात पती अडसर ठरत असल्याच्या संशयातून, पत्नीने प्रियकराच्या सांगण्यावरून गाढ झोपलेल्या पतीला विजेचा शॉक देऊन ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना कळंब तालुक्यातील पंगडी येथे उघडकीस आली आहे. याप्रकरणी वडगाव जंगल पोलिसांनी पत्नी व तिच्या प्रियकराला अटक केली आहे.

गजानन मोरे (वय ३८) असे जखमी पतीचे नाव असून, कवडी मोरे व तिचा प्रियकर विष्णू आत्राम अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी महिला व तिच्या प्रियकरामध्ये अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. या संबंधात पती अडसर ठरत असल्याने त्याला संपविण्याचा कट रचण्यात आला. ३ मेच्या मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास, प्रियकराच्या सांगण्यावरून पत्नीने गाढ झोपलेल्या पतीला विजेचा शॉक दिला. यात पती गजानन मोरे गंभीर जखमी झाले.

Extramarital Affair
Crime News : पत्नी आणि मेव्हुणीनं गळा दाबून खून केला, साडूनं शेतात मृतदेह लपवला; बीडमधील हत्याकांडानं अख्खं राज्य हादरलं

घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. जखमी गजानन मोरे यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच वडगाव जंगल पोलिसांनी तपास सुरू करून पत्नी कवडी मोरे आणि तिचा प्रियकर विष्णू आत्राम यांना अटक केली. पत्नीने विद्युत वायरला ॲल्युमिनियमची तार बांधून पतीला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. या घटनेत गजानन यांच्या दोन्ही हातांच्या दंडाला विजेचा शॉक लागला.

Extramarital Affair
Shocking : मुंबई हादरली! गार्डनमध्ये खेळणाऱ्या ९ वर्षीय मुलीसोबत पोलीस अधिकाऱ्याचे अश्लील वर्तन, प्राव्हेट पार्टही दाखवला

याप्रकरणी ८ मे रोजी रात्री वडगाव जंगल पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १०९(१) आणि ६१ (२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी प्रियकर विष्णू आत्राम व फिर्यादीची पत्नी कवडी मोरे हिला अटक केली आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक भाऊराव बोकांडे करीत आहेत. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश बैसाने व ठाणेदार विकास दांडे यांनी भेट दिली. या प्रकरणाचा पुढील तपास वडगाव जंगल पोलीस करीत आहेत.

Extramarital Affair
Shocking : मटण अर्धवट शिजलं, मित्रांसमोरच नवऱ्यानं वाद घातला; अपमान सहन न झाल्यानं बायकोनं संपवली जीवनयात्रा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com