

राज्यातील शेतकरी बांधवांकडून प्रधानमंत्री पीक विमा योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत ६१ लाख ८२ हजार २१८ शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी नोंदणी केली आहे. अद्याप काही शेतकरी तांत्रिक अडचणी, कागदपत्रांची पूर्तता अथवा इतर वैयक्तिक कारणांमुळे अर्ज दाखल करू शकलेले नाहीत. या बाबींचा विचार करून प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत ३१ जुलै २०२६ वरून १० ऑगस्ट २०२६ पर्यंत वाढवण्यात आली.
राज्यातील आठ कृषी विभागांच्या आकडेवारीनुसार, कोकण विभागातून १,०२,३३५, नाशिक विभागातून ३,३३,३८५, पुणे विभागातून ६,०७,६६३, कोल्हापूर विभागातून २,४०,२५३, छत्रपती संभाजीनगर विभागातून १३,२५,०००, लातूर विभागातून २,४२,८२६, अमरावती विभागातून ६,९१,९७३ आणि नागपूर विभागातून ४,५३,३८३ शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी नोंदणी केली आहे.
एकूण ६१ लाख ८२ हजार २१८ शेतकरी या योजनेत सहभागी झाले आहेत. मराठवाडा विभागातून सर्वाधिक, तर कोकण विभागातून सर्वात कमी प्रतिसाद मिळाल्याचे या आकडेवारीतून दिसून येते.
पीक कर्जदार शेतकऱ्यांनी संबंधित बँकेशी संपर्क साधून, तर बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी अधिकृत पोर्टल किंवा जवळच्या सेवा केंद्रामार्फत १० ऑगस्ट २०२६ पूर्वी अर्जाची प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.