BJP Gains Strength with New Entry in Solapur
BJP Gains Strength with New Entry in SolapurSaam

पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसला धक्का; बड्या महिला नेत्याचं भाजपात प्रवेश, ऑपरेशन लोटसला यश

BJP Gains Strength with New Entry in Solapur: काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोलापूरच्या दौऱ्यावर असताना, काँग्रेसच्या माजी नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांनी भाजपात प्रवेश केला.
Published on
Summary
  • सोलापुरात भाजपाच्या ऑपरेशन लोटसला वेग

  • काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्या प्रभागातच ऑपरेशन लोटस

  • काँग्रेसच्या माजी नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांचा भाजपात प्रवेश

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे. अवघ्या काही तासांनंतर नगरपरिषद तसेच नगरपंचायतीच्या निवडणुका पार पडेल. याच पार्श्वभूमीवर फोडाफोडीच्या राजकारणाला वेग आला आहे. सोलापुरात भाजपकडून ऑपरेशन लोटस राबवले जात आहे. यामुळे अनेक पक्षांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. अशातच सोलापुरात काँग्रेसला मोठा फटका बसला आहे. काँग्रेसच्या माजी महिला नगरसेवक यांनी भाजपला पाठिंबा दिला आहे.

सोलापुरात सध्या भाजपकडून ऑपरेशन लोटस राबवलं जात आहे. याचा फटका सध्या प्रत्येक पक्षाला बसत आहे. नुकतंच सोलापुरात काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्या प्रभागातच भाजपकडून ऑपरेशन लोटस राबवण्यात आलं. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलंय. अशातच काँग्रेसच्या माजी नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांनी पक्षाची साथ सोडली.

BJP Gains Strength with New Entry in Solapur
'आंचल माझी मुलगी नाही तर..' लेकाच्या मृत्यूनंतर सक्षमची आई काय म्हणाली? गुणरत्न सदावर्तेंकडे केली मोठी मागणी

काल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापूर दौऱ्यावर होते. त्यांनी गावागावात जाऊन जनतेला विकास करणार असल्याचं आश्वासन दिलं. अशातच फडणवीस यांच्या उपस्थितीत काल काँग्रेसच्या माजी नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांनी भाजपचं कमळ हाती घेतलंय. यामुळे सोलापुरात भाजपला आणखी बळ मिळालं आहे.

BJP Gains Strength with New Entry in Solapur
पुणे हादरलं! पुरूषाचं विवाहित स्त्रीसोबत अनैतिक संबंध; लग्नासाठी हट्ट करताच जिवंत जाळलं, शेवटी पुरावा मागे सुटला

सोलापुरात सध्या ऑपरेशन लोटसची प्रचंड चर्चा आहे. ऑपरेशन लोटस करण्यामध्ये पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार देवेंद्र कोठे यांची प्रमुख भूमिका आहे. भाजप नेत्यांमुळे पक्षाची अधिक ताकद वाढली असल्याचं बोललं जात आहे. यावेळी आमदार देवेंद्र कोठेंनी 'अबकी बार ७५ पारचा नारा दिला'. तसेच शहर उत्तर, शहर मध्य, आणि सोलापूर दक्षिण मतदार संघात ज्या ठिकाणी भाजपचा नगरसेवक निवडून आलेला नाही अशा जागांना लक्ष्य केलं. या पक्षप्रवेशावेळी आमदार सुभाष देशमुख, आमदार विजयकुमार देशमुख यांची देखील उपस्थिती होती.

BJP Gains Strength with New Entry in Solapur
वंशाच्या दिव्यासाठी गर्भवती महिलेचा छळ; सासरच्या त्रासाला कंटाळून मृत्यूला कवटाळलं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com