Amol Mitkari: अमोल मिटकरींच्या घराबाहेर पोलिसांचा प्रचंड फौजफाटा; अकोल्यात नेमकं काय घडतंय?

Threat Calls To Amol Mitkari: अमोल मिटकरींना काल (२३ फेब्रुवारी) धमकीचे फोन आले होते. त्यामुळे त्यांच्या घरासमोर पोलिसांचा कडेकोड बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
Security To Amol Mitkari
Security To Amol MitkariSaam Tv
Published On

Police Security To Amol Mitkari

अकोल्यातून (Akola) एक मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी आमदार अमोल मिटकरींच्या (Amol Mitkari) घरासमोर आता पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. फोनवरुन मिळालेल्या धमकीच्या कॉल्सनंतर हा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यामध्ये जवळपास 7 ते 8 पोलीस कमर्चारी तैनात करण्यात आले आहेत. (Latest Crime News)

सिव्हिल पोलीस स्टेशनचे ठाणेदार अजित जाधव हे मिटकरींच्या निवासस्थानी आहे. अकोला शहरातल्या तोष्णीवाल लेआउटमधील मिटकरींच्या निवासस्थानी हे पोलीस तैनात झाले आहेत. अमोल मिटकरींच्या घरासमोर पोलिसांचा कडेकोड बंदोबस्त (Police Security) तैनात करण्यात आला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अमोल मिटकरींना धमकीचा फोन

आमदार अमोल मिटकरी यांना काल दिवसभरात धमकीचे पाच ते सहा कॉल आले होते. त्यांच्या घरावर आणि वाहनावर दगडफेक करण्याची धमकी फोनद्वारे देण्यात आली (Threat Calls To Amol Mitkari) होती. यानंतर एकच खळबळ उडाली होती. अकोला पोलीस अधिक्षकांच्या नावांनं आपल्याला धमकीचे फोन आल्याचा थेट आरोप मिटकरींनी केला होता.

माझ्या परिवारातील कुणाच्याही केसालाही धक्का लागल्यास याला जबाबदार खदान आणि अकोला पोलीस राहणार असल्याचं, अमोल मिटकरींनी म्हटलं होतं. या संदर्भात त्यांनी काल रात्री (२३ फेब्रुवारी) खदान पोलिसांत आपली तक्रार नोंदवली (crime news) होती. त्यानुसार आता पुढील कारवाई सुरू आहे. त्यानंतर हा पोलीस बंदोस्तत लागला आहे.

Security To Amol Mitkari
Bomb Threat Pune : पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी; हडपसरमधून एकाला घेतलं ताब्यात

मिटकरींच्या घराबाहेर तगडा पोलीस बंदोबस्त

नरेश राऊत नामक व्यक्तीने ही धमकी दिल्याची माहिती मिळत आहे. तो पोलीस बॉयज संघटनेचा व्यक्ती असल्याचं सांगण्यात येत आहे. 10 हजार रुपयांमध्ये सुपारी घेऊन ही धमकी देण्यात आल्याचं मिटकरी म्हटलं (Police Security To Amol Mitkari) होते. अमोल मिटकरींना धमकीचे फोन आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.

आमदार अमोल मिटकरी यांच्या सुरक्षेबाबत आता पोलीस आता अॅक्शनमोडमध्ये आले (Threat Calls) आहेत. अमोल मिटकरींच्या घराबाहेर तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यांच्या सुरक्षेची काळजी घेतली जात आहे. तसंच धमकीचा फोन करणाऱ्या व्यक्तीचा देखील सखोल तपास करण्यात येत आहे.

Security To Amol Mitkari
Mumbai Bomb Threat: मोठी बातमी! मुंबईत बॉम्ब ठेवल्याची धमकी, पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com