Risky Traveling In River: भयावह! नदीतून अंगावर काटे आणणारा प्रवास, आमदार अमोल मिटकरी म्हणाले...

Akola Risky Traveling In River: अकोला जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या जिल्ह्यातील एका गावात शेतकरी पुरुष आणि महिलांना शेतात जाण्यासाठी चक्क जवळपास ८ ते १४ फूट नदीच्या पाण्यातून जीवघेणा प्रवास करावा लागतोय.
Risky Traveling In River
Risky Traveling In RiverSaam Digital
Published On

Risky Traveling In River

अकोला जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या जिल्ह्यातील एका गावात शेतकरी पुरुष आणि महिलांना शेतात जाण्यासाठी चक्क जवळपास ८ ते १४ फूट नदीच्या पाण्यातून जीवघेणा प्रवास करावा लागतोय. राष्ट्रवादी आमदार अमोल मिटकरी यांनी हा नदीवरील प्रवास पाहून अंगावर अक्षरशः काटे आणणारा प्रकार असल्याचं म्हटलं आहे.

अकोल्यातल्या बाळापूर तालुक्यातील ग्राम कुपटा गावातून निगुर्णा नदी वाहते. गावातल्या अनेक ग्रामस्थांची शेतजमीन नदीपात्राच्या दुसऱ्या बाजूला आहे. त्यामुळे शेतात येजा करण्यासाठी गावकऱ्यांना मोठा प्रश्न आहे. नदीवर पूल नसल्याने गावकऱ्यांनी थेट जुगाड करत नदीवरचा प्रवास सोपा केलाय. चार प्लास्टिकचे ड्रम, तसेच झोपण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या बाजेचा वापर करीत एक बोट तयार केली असून त्याला दोन्ही बाजूने दोरी बांधली. या बाजेवर बसून शेतकरी महिला व पुरुष नदीपात्राच्या दुसऱ्या बाजूला ये जा करताहेत. हा नदीवरचा प्रवास जरी सोयीसकर असला तरी जीवघेणा आहे.

(साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Risky Traveling In River
Raj Thackeray: '१० वर्ष केंद्रात निर्विवाद सत्ता असताना..' राज ठाकरेंच्या लालकृष्ण अडवाणींना खास शुभेच्छा; भाजपला खोचक टोला

गावकऱ्यांनी नदीवर पूल उभारण्यासाठी अनेकदा संबंधित विभागाकडे मागणी केली आहे, परंतु अजूनही त्यांचा प्रश्न मिटलेला नाही. अखेर आज राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी या गावात भेट दिली आणि गावकऱ्यांचा हा जिवघेणा प्रवास कधी थांबणार आहे असा प्रश्न करत थेट फोनवरू अधिकाऱ्यांना सुनावलं आहे.

Risky Traveling In River
Aditya Thackeray: 'कायदा आणि सुव्यवस्थेची ही एक झलक...' गोळीबार प्रकरणावरुन आदित्य ठाकरेंचे भाजप- शिंदे गटावर टीकास्त्र

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com