Mumbai Bomb Threat: मोठी बातमी! मुंबईत बॉम्ब ठेवल्याची धमकी, पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर

Mumbai Bomb Threat News In Marathi: मुंबईत बाॅम्ब ठेवल्याच्या धमकीचा फोन आल्यानंतर तामिळनाडू पोलिसांनी मुंबई पोलीस नियंत्रण कक्ष आणि राज्य पोलिस नियंत्रण कक्षाला माहिती दिली आहे. या घटनेने पोलीस दल अलर्ट मोडवर आलं आहे.
Mumbai Bomb Threat News
Mumbai Bomb Threat News Saam tv
Published On

Mumbai Crime News:

तामिळनाडू पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला मुंबईत बॉम्ब ठेवल्याचा धमकी वजा फोन आला आहे. मुंबईत बाॅम्ब ठेवल्याच्या धमकीचा फोन आल्यानंतर तामिळनाडू पोलिसांनी मुंबई पोलीस नियंत्रण कक्ष आणि राज्य पोलिस नियंत्रण कक्षाला माहिती दिली आहे. या मुंबईत बॉम्ब ठेवल्याच्या धमकीनंतर पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत बॉम्ब ठेवल्याचा धमकी वजा फोन तामिळनाडून पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला आला. त्यानंतर त्यांनी तातडीने मुंबई पोलिस नियंत्रण कक्ष व राज्य पोलिस नियंत्रण कक्षाला कल्पना दिली. शनिवारी मध्यरात्री हा धमकीचा फोन तामिळनाडू नियंत्रण कक्षाला करण्यात आला होता. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Mumbai Bomb Threat News
Delhi Crime News: भारतीय वंशाच्या अमेरिकन महिलेवर पंचारांकित हॉटेलमध्ये बलात्कार, खासगी कंपनीच्या सीईओविरोधात तक्रार

फोन करणाऱ्या व्यक्तीचे नाव सुब्रम्हण्यम असल्याची माहिती तामिळनाडू पोलिसांनी राज्यातील पोलिसांना दिली आहे. या प्रकरणी मुंबई पोलीस अधिक तपास करत आहेत.

Mumbai Bomb Threat News
Pune Crime News : मुळशी तालुक्यात माजी सरपंचांच्या घरातून सात लाखांचे दागिने लंपास

मुंबईतील काही ठिाणी बॉम्ब ठेवल्याची धमकी

काही दिवसांपूर्वी मुंबईतील नामांकित संग्रहलयांना बॉम्बने उडवून देण्याची धमकीचे ई-मेलद्वारे प्राप्त झाली होती. यामध्ये वरळीचे नेहरू विज्ञान केंद्र, कुलाब्यातील छत्रपती शिवाजी महाराज वास्तू संग्रहालयाचा सामावेश होता. बॉम्बस्फोटाचा इशारा देणारे धमकीचे ई-मेल आल्याचे समोर आलं आहे. ई-मेल अज्ञात व्यक्तींनी काही दिवसांपूर्वी सकाळपासून अनेक संग्रहालयांमध्ये केले होते.

संग्रहालयांच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांना याची माहिती दिल्याने पोलिसांनी बॉम्ब निकामी पथकासह संग्रहालयाभोवतीच्या परिसरात तपास सुरू केला होता. मात्र अद्याप काहीही संशयास्पद आढळून आलं नव्हता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com