crime news
crime newssaam tv

Pune Crime News : मुळशी तालुक्यात माजी सरपंचांच्या घरातून सात लाखांचे दागिने लंपास

पौड पोलिस घटनेचा तपास करीत आहेत.
Published on

Mulshi Crime News :

पुण्याच्या मुळाशी (mulshi) तालुक्यातील पौंड गावाचे माजी सरपंच विनायक गुजर यांच्या घरात चाेरी झाली. या घटनेत सात लाख बावीस हजारांचा ऐवज चोरांनी लंपास केला. यामध्ये सोने आणि चांदीच्या दागिन्यांचा समावेश. पाेलिस या घटनेचा तपास करीत आहेत. (Maharashtra News)

पाेलिसांकडून मिळालेल्या माहिती नुसार पौडच्या गजबजलेल्या जुन्या बाजारपेठेत गुजर यांचे घर आहे. या घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. आतील दोन दरवाज्याचे कुलूप तोडून घरातील कपाटाची कुलूप तोडून चोरट्यांनी चोरी केली. मागील दरवाज्याने चोर पळून गेल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

crime news
Pandharpur Mhapral Road Accident News: भीषण अपघात पाहताच आमदार भरत गोगावलेंनी थांबविला ताफा अन्...

या घटनेत सोन्याच्या अंगठ्या, साेन्याचे गोप, साखळी, ब्रेसलेट, पोत, बदामाचे पान, चांदीचे ताम्हण, बांगड्या, गणपतीचा मुकुट, पैंजण, मनगटे, कानातील मोत्यांची व चांदीच्या कुड्या असे साडेअकरा तोळे सोने व 46 तोळे चांदी चाेरीस गेल्याची नाेंद करण्यात आली आहे. पौड पोलिस चोरांचा शोध घेत आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)


Edited By : Siddharth Latkar

crime news
Mumbai Passenger Reservation System: रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी... प्रवासी आरक्षण प्रणाली राहणार बंद

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com