पुण्यात पुन्हा एकदा बॉम्ब स्फोट घडवून आणण्याची धमकी देण्यात आली आहे. शिवाजीनगर आणि पुणे स्टेशनसह पिंपरी चिंचवडमध्ये बॉम्बस्फोटाची धमकी देणारा कॉल पोलिसांना आला होता. दरम्यान पोलिसांनी कॉल करणाऱ्या व्यक्तीला अटक केली आहे. धमकीचा कॉल करणारा माथेफिरू हडपसर भागातील असून अफवा पसरवल्याचं पोलीस तापासात उघड झालं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे पोलिसांना एका अज्ञात नंबर वरून आज फोन आला होता. या व्यक्तीने शिवाजीनगर, पुणे स्टेशन आणि पिंपरी चिंचवडमध्ये बॉम्ब घडवून आणण्याची बतावणी केली. त्यामुळे पोलीस यंत्रणाही हादरून गेली. सर्व यंत्रणांनी अलर्ट करण्यात आलं आणि अज्ञात नंबरचा शोध सुरू झाला. पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत त्या व्यक्तीला गाठलं आणि ताब्यात घेतलं. दरम्यान या माथेफीरूने अफवा पसरवण्यासाठी पोलिसांना कॉल केल्याचं तपासात उघडं झालं. त्यानंतर पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
कल्याण-मोहने आंबिवली परिसरातील एनआरसी कॉलनी काल सायंकाळी सात वाजताच्या सुमारास मोठा स्फोट झाला. या स्फोटाचा तीव्रता इतकी मोठा होता की, मोहने,आंबिवली, तिपन्नानगर, एनआरसी कॉलनी परिसरातील नागरिकांच्या घरांना हादरे बसले. या घटनेमुळे नागरिक भयभीत झाले. या भागात स्फोट करणाऱ्या विकासकाच्या विरोधात कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिंदे गटाचे माजी नगरसेवक मयूर पाटील यांनी केली आहे. नागरिकांच्या जिवीताला धोका असल्याने स्फोट थांबविले नाही तर या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.