Zero Snake Death: सर्पदंशामुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी 'Zero Snakebite Death' मिशन, नारायणगावमधील दाम्पत्याचा उपक्रम

Zero Snake Death Campaign: सर्पदंशामुळे मृत्यू झालेल्या लोकांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळेच नारायणगाव एका डॉक्टरांनी शून्य सर्पदंश मृत्यू (Zero Snake Death) हा उपक्रम सुरु केला आहे.
Doctor Sadanand And Pallavi Raut
Doctor Sadanand And Pallavi RautSaam Tv

Zero Snake Death Campaign By Narayangaon Doctor:

साप हा शेतकऱ्याचा मित्र मानला जातो. परंतु सर्पदंशामुळे अनेकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये सापांमुळे मृत्यू झालेल्या लोकांची संख्या वाढली आहेत. त्यामुळेच नारायणगाव येथील डॉ. सदानंद आणि पल्लवी राऊत यांनी 'शून्य सर्पदंश मृत्यू' (Zero Snakebite Death) हा उपक्रम हाती घेतली आहे.

सर्पदंशामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या कमी करण्यासाठी हा उपक्रम हाती घेतला आहे. २०२२ च्या अभ्यासानुसार, देशात सुमारे ६४,००० लोकांचा सर्पदंशाने मृत्यू झाला आहे. ज्यात ग्रामीण भागातील मृत्यू झालेल्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे डॉ. सदानंद आणि पल्लवी राऊत यांनी हा उपक्रम राबवला आहे. (Latest News)

कोब्रा चावल्याने एका मुलीच्या दुर्दैवी मृत्यू झाला. त्यानंतर डॉ. सदानंद यांनी हा उपक्रम सुरु केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, सोयाबीन आणि ऊस यांसारखी पिके घेणाऱ्या प्रदेशात सापांचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांना याचा सामना करावा लागतो.

मागील २८ वर्ष डॉ. सदानंद आणि पल्लवी राऊत हे काम करत आहे. त्यांनी रुग्णालयात जीवनरक्षक उपकरणे आणि सर्पदंशावर अँटीवेनम डोस उपलब्ध करुन दिला आहे. त्यामुळे जवळपास ६ हजार सर्पदंश झालेल्या लोकांना वाचवले आहे.

Doctor Sadanand And Pallavi Raut
NCP News: राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने १८ फेब्रुवारीला नवीमुंबईमध्ये अल्पसंख्याक विश्वास मेळाव्याचे आयोजन

डॉ. सदानंद आणि पल्लवी खेडेगावात, शाळांमध्ये, वैद्यकिय महाविद्यालयांमध्ये जनजागृतीसाठी कार्यक्रम करतात. विषारी साप ओळखण्यासाठी हजारो लोकांना प्रशिक्षण दिले आहे. त्यामुळेच मोठ्या प्रमाणात जनजागृती होत आहे.

Doctor Sadanand And Pallavi Raut
Maratha Reservation : बैलगाडीसह जेलभरो आंदोलन; जिंतूरात सकल मराठा समाज आक्रमक

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com