NCP News
NCP NewsSaam TV

NCP News: राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने १८ फेब्रुवारीला नवीमुंबईमध्ये अल्पसंख्याक विश्वास मेळाव्याचे आयोजन

Organization of minority faith meeting: अल्पसंख्याक विश्वास मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे उपस्थित राहणार आहेत.
Published on

रुपाली बडवे

Navi Mumbai News:

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्याक सेलच्यावतीने शिक्षण, आरक्षण व संरक्षणाच्या प्रश्नावर राज्यस्तरीय 'अल्पसंख्याक विश्वास मेळाव्या'चे आयोजन करण्यात येणार आहे. दिनांक १८ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता सिडको कन्वेक्शन सेंटर वाशी (नवीमुंबई) इथे हा मेळावा होणार आल्याची माहिती अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश निरीक्षक नजीब मुल्ला यांनी दिली.

NCP News
NCP MLA Disqualification च्या निकालानंतर जयंत पाटील नेमकं काय म्हणाले?

राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने षण्मुखानंद सभागृहात भव्य महिला मेळावा झाला. त्यानंतर युवा मिशन मेळावा पुणे बालेवाडी इथे पार पडल्यानंतर आता 'अल्पसंख्याक विश्वास मेळाव्या' चे आयोजन करण्यात आले आहे. अल्पसंख्याक विश्वास मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे उपस्थित राहणार आहेत.

यासह अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर, कृषीमंत्री धनंजय मुंडे, महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील,अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मारावबाबा आत्राम, क्रीडामंत्री संजय बनसोडे, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर,अल्पसंख्याक सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष सय्यद जलालोद्दीन, मुंबई विभागीय अध्यक्ष समीर भुजबळ, आमदार बाबाजानी दुर्रानी, माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकी, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण आदी उपस्थित राहणार आहेत.

तरी या विश्वास मेळाव्याला राज्यातील सर्व अल्पसंख्याक समाजातील लोकांनी उपस्थित रहावे असे आवाहन अल्पसंख्याक सेलचे प्रदेश निरीक्षक नजीब मुल्ला, अल्पसंख्याक सेलचे प्रदेशाध्यक्ष इद्रीसभाई नायकवडी, राज्य कार्याध्यक्ष वसीम बुऱ्हाण यांनी केले आहे.

NCP News
UP Crime News: संशयाचं भूत शिरलं, पत्नीचं शीर धडावेगळं केलं; बाराबंकीतील थरकाप उडवणारी घटना

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com