रत्नागिरीच्या MIDCमध्ये वेश्याव्यवसाय, पुण्यातील २ तरूणींच्या मदतीनं देहविक्री सुरू; पोलिसांकडून पर्दाफाश

Ratnagiri Crime News: रत्नागिरीत वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश. नेपाळी महिला अटकेत. पुण्यातील तरूणींच्या मदतीनं रॅकेट चालवत असल्याचं निष्पन्न.
Ratnagiri Crime News
Ratnagiri Crime Newssaam Tv
Published On
Summary
  • रत्नागिरीच्या एमआयडीसीत वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश.

  • पोलिसांनी छापा टाकला.

  • नेपाळी महिला ताब्यात.

रत्नागिरीतून धक्कादायक बातमी समोर येत आहे. मिरजोळे एमआयडीसी येथे सुरू असलेल्या वेश्याव्यसायाचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पुण्यातील २ तरूणींच्या मदतीनं नेपाळी महिला हा वेश्याव्यवसाय चालवत असल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. पोलिसांनी महिलेविरोधात गुन्हा दाखल केला असून, आरोपी महिलेला अटकही करण्यात आली आहे.

गीता छबी थापा असं गुन्हा दाखल करण्यात आलेल्या महिलेचं नाव आहे. रत्नागिरी शहरालगतच्या मिरजोळे एमआयडीसी येथे वेश्याव्यवसाय सुरू होता. या भागात वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती रत्नागिरीच्या स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. त्यांना ही माहिती गोपनीय सुत्रांकडून मिळाली. पोलिसांनी तातडीने छापा टाकण्याचे ठरवले.

Ratnagiri Crime News
नाशिककरांनो पाणी जपून वापरा, शनिवारी शहरात पाणी नाही, रविवारीही.. नेमकं कारण काय?

पुण्यातील दोन तरुणींच्या मदतीने नेपाळी महिला हा वेश्याव्यवसाय चालवत होती. गोपनीय माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने या प्रकाराचा पर्दाफाश केला. या प्रकरणी संशयित नेपाळी महिलेविरोधात ग्रामिण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

Ratnagiri Crime News
म्हाडाकडून बंपर लॉटरी; पिंपरी चिंचवडमध्ये प्राईम लोकेशनवर फक्त ₹२० लाखांत घर, आजच अर्ज करा

भंडाऱ्यात देहविक्री व्यवसायाचा भंडाफोड

बांधकाम सुरू असलेल्या घरात देहविक्रीचा व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. ही धक्कादायक बाब भंडाऱ्यातील मेहेगाव मार्गावरील तुमसर येथून उघडकीस आली. जिल्हा पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने तातडीने कारवाई करत वेश्याव्यवसायावर छापा टाकला. वैभव बोरकर (४०), भरत कोल्हाडकर (३६) असे आरोपींची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध अनैतिक वाहतूक (प्रतिबंध) कायदा, १९५६ च्या कलम ३, ४ आणि ५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Ratnagiri Crime News
ग्राहकांसाठी खुशखबर! सणासुदीला सोन्याच्या दरात घसरण, चांदीही स्वस्त; पाहा २४ कॅरेट सोन्याचा लेटेस्ट दर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com