ग्राहकांसाठी खुशखबर! सणासुदीला सोन्याच्या दरात घसरण, चांदीही स्वस्त; पाहा २४ कॅरेट सोन्याचा लेटेस्ट दर

Latest Gold Rates: २४ कॅरेट १० ग्रॅम सोनं ₹५४०, २२ कॅरेट १० ग्रॅम सोनं ₹५००, तर १८ कॅरेट १० ग्रॅम सोनं ₹४०० ने स्वस्त झाले आहे.
Today Gold Rate
Today Gold RateSaam Tv
Published On
Summary
  • आज (१८ सप्टेंबर) सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली.

  • २४ कॅरेट सोनं प्रति १० ग्रॅम ₹५४० ने, २२ कॅरेट सोनं ₹५०० ने, तर १८ कॅरेट सोनं ₹४०० ने स्वस्त झाले.

  • १० तोळं २४ कॅरेट सोनं खरेदीसाठी आता ₹११,११,७०० मोजावे लागतील.

  • चांदीच्या दरातही ₹१,००० ने घसरण झाली असून १ किलो चांदीचा दर ₹१,३१,००० झाला आहे.

गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्यानं चढ उतार पाहायला मिळत आहे. आता काही दिवसांत नवरात्र सणाला सुरूवात होईल. नंतर दसरा आणि दिवाळी. एकामागोमाग येणाऱ्या सणानिमित्त आपण सोन्याचे किंवा चांदीचे दागिने हमखास खरेदी करतो. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे दर वधारले होते. आज सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळत आहे. १० तोळं सोन्याच्या दरात ५,४०० रूपयांची घसरण झाली आहे.

१८ सप्टेंबर २०२५. आज सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळत आहे. २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याच्या दरात ५४० रूपयांची घसरण झाली आहे. २४ कॅरेट १ तोळं सोनं खरेदीसाठी आपल्याला १,११,१७० रूपये मोजावे लागतील. तर, २४ कॅरेट १०० ग्रॅम सोन्याच्या दरात ५,४०० रूपयांची घसरण पाहायला मिळत आहे. २४ कॅरेट १० तोळं खरेदीसाठी आपल्याला ११,११,७०० रूपये मोजावे लागतील.

Today Gold Rate
'माझ्या गर्लफ्रेंडशी का बोलतो?' बॉयफ्रेंडकडून त्याच्या डोक्यात कोयत्यानं वार, पुण्यासारखा नवी मुंबईत रक्तरंजित थरार

२४ कॅरेटप्रमाणे २२ कॅरेट सोन्याच्या दरातही घसरण झाली आहे. २२ कॅरेट १० ग्रॅम सोन्याच्या दरात ५०० रूपयांची घसरण झाली आहे. २२ कॅरेट १ तोळं सोनं खरेदीसाठी आपल्याला १,०१,९०० रूपये मोजावे लागतील. तर, २२ कॅरेट १०० ग्रॅम सोन्याच्या दरात ५,००० रूपयांची घसरण पाहायला मिळत आहे. २२ कॅरेट १० तोळं खरेदीसाठी आपल्याला १०,१९,००० रूपये मोजावे लागतील.

Today Gold Rate
चकमकीत आरोपीकडून पोलिसांवर हल्ला, गोळीबारात ३ पोलिसांचा मृत्यू, हल्लेखोराला संपवलं

२४,२२ प्रमाणे १८ कॅरेट सोन्याच्या दरातही घसरण पाहायला मिळत आहे. १८ कॅरेट १० ग्रॅम सोन्याच्या दरात ४०० रूपयांची घसरण झाली आहे. १८ कॅरेट १ तोळं सोनं खरेदीसाठी आपल्याला ८३,३८० रूपये मोजावे लागतील. तर, १८ कॅरेट १०० ग्रॅम सोन्याच्या दरात ४,००० रूपयांची घसरण पाहायला मिळत आहे. १८ कॅरेट १० तोळं खरेदीसाठी आपल्याला ८,३३,८०० रूपये मोजावे लागतील.

Today Gold Rate
मोदींच्या मनात पाप असलं तरी.., मी त्यांना दुश्मन मानत नाही; उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?

सोन्यासह चांदीच्या दरातही घसरण झाली आहे. चांदीच्या दरात १००० रूपयांची घसरण पाहायला मिळत आहे. १ किलो चांदी खरेदीसाठी १,३१,००० रूपये मोजावे लागतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com