'माझ्या गर्लफ्रेंडशी का बोलतो?' बॉयफ्रेंडकडून त्याच्या डोक्यात कोयत्यानं वार, पुण्यासारखा नवी मुंबईत रक्तरंजित थरार

Navi Mumbai Shocker: कोपरखैरणे परिसरात सलूनमध्ये काम करणाऱ्या तरुणावर सहा ते सात जणांच्या टोळीने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात तरुणाला गंभीर दुखापत झाली.
Navi Mumbai Shocker: कोपरखैरणे परिसरात सलूनमध्ये काम करणाऱ्या तरुणावर सहा ते सात जणांच्या टोळीने जीवघेणा हल्ला केला.
Navi Mumbai Shocker: कोपरखैरणे परिसरात सलूनमध्ये काम करणाऱ्या तरुणावर सहा ते सात जणांच्या टोळीने जीवघेणा हल्ला केला.Saam Tv
Published On
Summary
  • नवी मुंबईच्या कोपरखैरणेत टोळीने सलून कामगारावर कोयत्याने जीवघेणा हल्ला केला.

  • जखमी तरुण समीप अहमदच्या डोक्यावर ५ टाके पडले असून तो उपचार घेत आहे.

  • प्रेम प्रकरणाच्या वादातून हा हल्ला घडल्याची प्राथमिक माहिती आहे.

  • पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

वारंवार घडणाऱ्या गुन्हेगारी घटनांमुळे पुणे हादरत असतानाच नवी मुंबईतही एक भयंकर प्रकार समोर आला आहे. नवी मुंबईतील कोपरखौरणे परिसरातून टोळीनं माजवलेली दहशत पाहायला मिळाली. सलूनमध्ये काम करणाऱ्या कारागिराला सहा ते सात जणांच्या जमावाने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच डोक्यात जबर वार केले आहे. या हल्ल्यात तो रक्तबंबाळ झाला. तरूणाच्या डोक्याला ५ टाके पडले आहेत. प्रेम प्रकरणाच्या वादातून हा हल्ला झाला असल्याचं बोललं जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून नवी मुंबई परिसरात गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. १५ दिवसांपूर्वी कोपरखैरणे सेक्टर १९ मध्ये एकावर कोयत्यानं वार केल्याची घटना उघडकीस आली होती. अशातच २० दिवसांच्या आत पुन्हा एकावर टोळीनं जबर मारहाण केली. समीप शरीफ अहमद (वय वर्ष २३) असे जखमी तरूणाचे नाव आहे. हा तरूण कोपरखैरणे सेक्टर २० मधील 'ए झोन' सलूनमध्ये काम करतो. त्या ठिकाणी त्याची सहकारी सोनम सिंग हे एकमेकांच्या परिचयाचे आहेत. दोघांमध्ये दररोज संवाद व्हायचा.

Navi Mumbai Shocker: कोपरखैरणे परिसरात सलूनमध्ये काम करणाऱ्या तरुणावर सहा ते सात जणांच्या टोळीने जीवघेणा हल्ला केला.
शाळेसमोर भीषण अपघात, पोलिसाच्या कारने ३ विद्यार्थ्यांना चिरडलं, दोघांचा जागीच मृत्यू

चॅटिंगच्या माध्यमातून दोघांमध्ये कायम संवाद व्हायचा. याची माहिती सोनमच्या बॉयफ्रेंडला मिळाली. सोनमचा प्रियकर अरबाजने चॅट्स पाहिले. नंतर अरबाजने समीरला फोन करत दमदाटी करत शिवीगाळ केली. त्यामुळे समीर याने माफी मागून विषय संपवला होता.मात्र अरबाजाने पुन्हा समीरला फोन करत धमकी दिली होती.

Navi Mumbai Shocker: कोपरखैरणे परिसरात सलूनमध्ये काम करणाऱ्या तरुणावर सहा ते सात जणांच्या टोळीने जीवघेणा हल्ला केला.
कोळसेवाडी पोलीस ठाणे राडा प्रकरण; भाजपचे माजी आमदार गणपत गायकवाडांना दिलासा, कोर्टाकडून निर्दोष मुक्तता

यानंतर अरबाजने समीरला, 'सोनमच्या आईनं घरी बोलावले आहे, तू पण चल', असं सांगितले. मात्र, समीरने जाण्यास नकार दिला. नंतर अरबाजने सहा ते सात साथीदारांसह मिळून समीर याला लाथाबुक्याने मारहाण केली. नंतर कोयत्याने समीरच्या डोक्यात वार केले. या हल्ल्यात समीरच्या डोक्यात इजा झाली. त्याच्या डोक्यात पाच टाके पडले आहेत.

Navi Mumbai Shocker: कोपरखैरणे परिसरात सलूनमध्ये काम करणाऱ्या तरुणावर सहा ते सात जणांच्या टोळीने जीवघेणा हल्ला केला.
निवडणुका पुढे का ढकलल्या? कोर्टाने राज्य सरकारला विचारला जाब, वाचा राज्य सरकारनं कोणती कारणं दिली

या घटनेनंतर समीरने पोलीस ठाण्यात धाव घेतली. तसेच अरबाज आणि त्याच्या साथीदाराविरोधात कोपरखैरणे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे. वीस दिवसात दोनदा घडलेल्या या घटनेमुळे कोपरखैरणे परिसरात सध्या दहशतीचे वातावरण आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक उमेश शेडगे करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com