नाशिककरांनो पाणी जपून वापरा, शनिवारी शहरात पाणी नाही, रविवारीही.. नेमकं कारण काय?

Nashik Water Supply: नाशिकमध्ये शनिवारी पूर्ण दिवस पाणीपुरवठा बंद राहणार आहे. रविवारी कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे.
water Scarcity
water ScarcitySaam tv
Published On
Summary
  • नाशिकमध्ये शनिवारी पूर्ण दिवस पाणी नाही.

  • रविवारी कमी दाबाने पाणी येणार.

  • नागरिकांना काटकसरीनं पाणी वापरण्याचे आवाहन.

नाशिकरांसाठी महत्वाची बातमी समोर येत आहे. नाशिक शहरात उद्या पाणी पुरवठा नसणार आहे. शनिवारी संपूर्ण शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. रविवारी देखील कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. शहरातील विविध जलकुंभ, जलशुद्धीकरणाच्या पाईपलाईन दुरुस्ती आणि तांत्रिक कामानिमित्त पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती आहे.

नाशिकरांना वीकेंडला पाण्याची भीषण टंचाईचा सामना करावा लागणार आहे. कारण शहरातील विविध जलकुंभ तसेच जलशुद्धीकरणाच्या पाईपलाईन दुरूस्तीचं काम पार पडणार आहे. यासह काही तांत्रिक कामानिमित्त पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती आहे.

water Scarcity
म्हाडाकडून बंपर लॉटरी; पिंपरी चिंचवडमध्ये प्राईम लोकेशनवर फक्त ₹२० लाखांत घर, आजच अर्ज करा

शनिवारी नाशिक शहरात पूर्ण दिवस पाणी पुरवठा नसणार आहे. तर, रविवारी देखील कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. त्यामुळे शुक्रवारपासून नाशिककरांना काटकसरीने पाण्याचा वापर करावा लागेल. दरम्यान, शनिवारी पाणी नसल्याकारणामुळे नागरिकांना काटकसरीने पाण्याचा वापर करण्याचं आवाहन पालिका प्रशासनानं केलं आहे.

water Scarcity
कृष्णा आंदेकरचा जवळचा शूटर पोलिसांच्या तावडीत; कोमकरच्या हत्येसाठी पुरवली होती पिस्तुल

नाशिकमध्ये डेंग्यूचा थैमान

नाशिकमध्ये डेंग्यूच्या रूग्णसंख्येत वाढ झाली आहे. डेंग्यू रूग्णसंख्या ४०० पार गेलं आहे. सप्टेंबरच्या १७ दिवसांत ४६४ रूग्णांची नोंद झाली आहे. तर, ऑगस्ट अखेर एकूण ४२४ रूग्णांची नोंद झाली आहे. मलेरियासह चिकनगुनियाचेही ४९ रूग्ण आढळले आहेत. तर मलेरियाचे २१ रुग्ण आढळले आहेत. आरोग्य विभागाकडून डास निर्मूलनासाठी सतर्क असल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र वाढती रुग्णसंख्या पाहता आरोग्य विभागाच्या दाव्यावर नागरिकांनी प्रश्नचिन्ह निर्माण केला आहे.

water Scarcity
ग्राहकांसाठी खुशखबर! सणासुदीला सोन्याच्या दरात घसरण, चांदीही स्वस्त; पाहा २४ कॅरेट सोन्याचा लेटेस्ट दर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com