कृष्णा आंदेकरचा जवळचा शूटर पोलिसांच्या तावडीत; कोमकरच्या हत्येसाठी पुरवली होती पिस्तुल

Pune Crime Branch: आयुष कोमकरला संपवण्यासाठी मुनाफ पठाणनं पिस्तुल पुरवल्याचा आरोप. त्यामुळे त्याचाही या कटात सहभाग असल्याचं निष्पन्न झालं.
Pune Crime Branch
Pune Crime BranchSaam
Published On
Summary
  • पुण्यातील आयुष कोमकर हत्या प्रकरणात मुनाफ पठाणला पोलिसांनी अटक केली.

  • पिस्तुल पुरवल्याचा आरोप, आंदेकर टोळीशी जवळीक असल्याचं तपासात निष्पन्न.

  • सोनाली आंदेकर आणि प्रियांका आंदेकर यांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं.

पुण्यातील नाना पेठ परिसरात गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला आयुष कोमकरची गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी गुन्हे शाखेतील पोलिसांनी फरार आरोपी मुनाफ पठाणला ताब्यात घेतलं आहे. आज त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. गुन्हे शाखेनं फरार आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. मुनाफ पठाणने पिस्तुल पुरवले असल्याची माहिती पोलीस तपासातून उघड झाली आहे. या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

आयुष कोमकरला ठार मारण्यासाठी पिस्तुल पुरवल्याचा आरोप मुनाफ पठाण याच्यावर आहे. त्यामुळे या हत्याकांडात पठाणचाही सहभाग असल्याचं निष्पन्न झालं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुनाफ पठाण हा कुख्यात गुंड आणि शुटर कृष्णा आंदेकर याचा जवळचा सहकारी असल्याची माहिती आहे.

Pune Crime Branch
ग्राहकांसाठी खुशखबर! सणासुदीला सोन्याच्या दरात घसरण, चांदीही स्वस्त; पाहा २४ कॅरेट सोन्याचा लेटेस्ट दर

दरम्यान, वनराज आंदेकर यांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी रचलेल्या कटातही पठाणचा सहभाग असल्याची माहिती समोर आली आहे. मंगळवारी पुणे पोलिसांसमो कृष्णा आंदेकर शरण गेला. सध्या बंडु आंदेकरच्या टोळीचे सर्वच जण पोलिसांच्या तावडीत आहेत.

Pune Crime Branch
'माझ्या गर्लफ्रेंडशी का बोलतो?' बॉयफ्रेंडकडून त्याच्या डोक्यात कोयत्यानं वार, पुण्यासारखा नवी मुंबईत रक्तरंजित थरार

आयुष कोमकर हत्या प्रकरणात मोठी अपडेट

आयुष कोमकर हत्या प्रकरणात वनराज आंदेकर याची पत्नी तसेच कृष्णा आंदेकर याची पत्नी दोघींना चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. सोनाली आंदेकर आणि प्रियंका आंदेकर सध्या तपासासाठी पोलिसांच्या ताब्यात आहेत. चौकशीसाठी समर्थ पोलिसांनी त्यांना बोलावून घेतलं आहे. सध्या दोघींची गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू आहे.

Pune Crime Branch
भाजप आमदारांसोबत संगनमत अन् महिलांशी गैरवर्तणूक; शिवसेनेच्या नेत्यावर आरोप, पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

कृष्णा आंदेकर पोलिसांसमोर शरण गेला

बंडु आंदेकरचा मुलगा आणि वनराज आंदेकरचा भाऊ कृष्णा आंदेकर सध्या पोलिसांसमोर शरण गेला आहे. बंडु आंदेकरसह १२ जणांना न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळेस 'कृष्णा आंदेकरची माहिती दे, नाहीतर गोळ्या झाडू', अशी धमकी पोलिसांनी दिल्याचं न्यायालयात बंडू आंदेकरनं सांगितलं. मात्र, बंडु आंदेकरनं केलेले सर्व आरोप तपास अधिकाऱ्यांनी फेटाळून लावले. कृ्ष्णा आंदेकरला याची माहिती मिळताच त्यांनं पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com