भाजप आमदारांसोबत संगनमत अन् महिलांशी गैरवर्तणूक; शिवसेनेच्या नेत्यावर आरोप, पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

Buldhana as Shinde Group: भाजपा आमदारांसोबत संगनमत, शिवसेना शिंदे गटाच्या कामात अडथळा आणि महिला आघाडी जिल्हा प्रमुखांशी गैरवर्तणूक केल्याचा गंभीर आरोप जिल्हाप्रमुख शांताराम दाणे पाटील यांच्यावर करण्यात आला.
Buldhana as Shinde Group
Buldhana as Shinde GroupSaam
Published On
Summary
  • बुलढाण्यात शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख शांताराम दाणे पाटील यांच्यावर गंभीर आरोप.

  • भाजपा आमदारांसोबत संगनमत आणि महिला आघाडी प्रमुखांशी गैरवर्तणुकीचे आरोप.

  • घाटाखालील सहा तालुक्यांतील पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे.

  • स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटात मोठी खळबळ.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटात धुसफूस सुरू आहे. बुलढाण्यातील जिल्हा प्रमुख शांताराम दाणे पाटील यांच्याविरोधात शिवसेना एकवटली आहे. शिवसेना शिंदे गटातील पदाधिकाऱ्यांनी शांताराम दाणे पाटील यांच्याविरोधात गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या कारभाराला कंटाळून पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

शिवसेना शिंदे गटाचे बुलढाण्यातील जिल्हाप्रमुख शांताराम दाणे पाटील यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहे. शांताराम दाणे पाटील यांच्याविरोधात शिंदे गटातील पदाधिकारी एकवटली आहे. शिवसेनेतील काही पदाधिकाऱ्यांनी पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

Buldhana as Shinde Group
'माझ्या गर्लफ्रेंडशी का बोलतो?' बॉयफ्रेंडकडून त्याच्या डोक्यात कोयत्यानं वार, पुण्यासारखा नवी मुंबईत रक्तरंजित थरार

भाजपच्या दोन आमदारांसोबत संगनमत करून शिवसेना शिंदे गटाच्या कार्यात अडथळा आणत असल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांनी केला. तसेच महिला आघाडी जिल्हा प्रमुख यांच्याशीही गैरवर्तणूक केल्याचा गंभीर आरोप पदाधिकाऱ्यांनी तक्रारीत केला आहे. त्यांनी यासंदर्भातील लेखी तक्रार संपर्क प्रमुख प्रतापराव जाधव यांच्याकडे सोपवला. पदाधिकाऱ्यांनी तक्रारीत शांताराम दाणे पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

Buldhana as Shinde Group
ग्राहकांसाठी खुशखबर! सणासुदीला सोन्याच्या दरात घसरण, चांदीही स्वस्त; पाहा २४ कॅरेट सोन्याचा लेटेस्ट दर

पाटील यांच्या कारभाराला कंटाळून शिवसेनेच्या घाटा खालील सहा तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले. त्यांनी हे राजीनामे संपर्क प्रमुख प्रतापराव जाधव यांच्याकडे सोपवले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटातील पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला असल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Buldhana as Shinde Group
'कृष्णा तुझा एन्काऊंटर करू' पोलिसांचा १ फोन अन् कृष्णाची तंतरली, २४ तासांच्या आत हजर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com