Dhule Crime News : दारुच्या नशेत पत्नीला संपवलं, कोतवाल पाेलिसांच्या ताब्यात

Shirpur : या घटनेचा पुढील तपास धुळे पाेलिस दलाचे शिरपूर तालुका पोलिस करीत आहेत.
Dhule , Shirpur
Dhule , Shirpursaam tv

Dhule News : पती पत्नीच्या किरकाेळ वादानंतर झालेल्या भांडणानंतर पतीने पत्नीस लाकडी दांडक्याने मारहाण केली. या घटनेत पत्नीचा जागीच मृत्यू झाला. धुळे पाेलिस दलाने पतीस ताब्यात घेतले आहे. (Maharashtra News)

Dhule , Shirpur
Majalgaon Dam Water Level : बीडकरांवर पाणीसंकट, माजलगाव धरणाच्या पातळीनं वाढवली चिंता

पाेलिसांकडून मिळालेल्या माहितीनूसार ही घटना शिरपूर तालुक्यातील मोहिदा येथे घडली. नंदा पावरा व बाळू पावरा हे दांपत्य त्यांच्या शेतामध्ये असलेल्या घरात राहत. या शेतकरी दांपत्याचा रात्री वाद झाला.

Dhule , Shirpur
Bhimashankar News : हर हर महादेव... ओम नमः शिवाय...; शेकडाे भाविक भिमाशंकरच्या चरणी

या वादानंतर बाळू याने दारुच्या नशेत नंदा यांच्या डोक्यात लाकडी दांडके मारले. जबर मारहाण झाल्याने पत्नी नंदा (वय 30) यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच शिरपूर तालुका पोलीस घटनास्थळी तात्काळ दाखल झाले.

Dhule , Shirpur
Ravikant Tupkar vs Raju Shetti : अखेर राजू शेट्टींनी रविकांत तुपकरांना सुनावलं

कोतवाल म्हणून कार्यरत असलेला मारेकरी पती बाळू पावरा (वय 40) यास पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतले. नंदा पावरा यांचा मृतदेह पोलिसांनी उत्तरीय तपासणीसाठी पाठविला आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com