Bhimashankar News : हर हर महादेव... ओम नमः शिवाय...; शेकडाे भाविक भिमाशंकरच्या चरणी

Adhik Mass 2023 : भक्तीभावाने भाविक आधिक मास यात्रा पुर्ण करताना पहायला मिळताहेत
Bhimashankar, adhik mass 2023
Bhimashankar, adhik mass 2023saam tv
Published On

Bhimashankar News : भिमाशंकरचा संपुर्ण परिसर हिरवाईच्या सौंदर्याने नटला आहे. अशा अल्हाददायक वातावरणातील निसर्गाच्या सानिध्यात पर्यटकांसह भाविक कुटुंबासमवेत भिमाशंकरला येऊ लागलेत. त्यातच आधिक श्रावण मास एकत्र जोडुन आल्याने भिमाशंकरला आज (साेमवार) शेकडाे भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे. (Maharashtra News)

Bhimashankar, adhik mass 2023
Pandharpur News : दाेन हजार रुपयांत विठ्ठलाचे झटपट दर्शन? भाविकांसह एजंट चाैकशीच्या फे-यात

बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भिमाशंकर येथे पहाटे शिवलिंगावर दुग्धाभिषेक , महाआरती झाल्यानंतर मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले. आज आधिक मासातला तिसरा सोमवार आहे. भाविकांनी पहाटेपासूनच दर्शनासाठी गर्दी केली आहे.

Bhimashankar, adhik mass 2023
Pune Rickshaw Driver : रिक्षा चालकांचा प्रामाणिकपणा, सात ताेळे साेन्याचे दागिन्यांसह चांदीचे अलंकाराची बॅग केली परत

भिमाशंकर आणि परिसरातील डोंगररांगामध्ये निसर्गाच्या अविष्काराने फुलुन गेलेल्या परिसरात वर्षा विहार करण्यासाठी निघालेल्या पर्यटकांची सुरक्षा तसेच दुदैवी घटना रोखण्यासाठी पोलिसांची फौज मंचर भिमाशंकर मार्गावर तैनात करण्यात आली आहे.

धुडगुस घालणा-यांवर कडक कारवाईचे धोरण पोलिसांनी हाती घेतले आहे. प्रत्येक वाहनाची आणि वाहन चालकाची पोलिसांकडुन कसून तपासणी केली जात आहे.

Bhimashankar, adhik mass 2023
MSRTC Bus: शाळा, काॅलेजला न जाता विद्यार्थ्यांनी बससाठी छेडले आंदाेलन, क-हाड तालुक्यातील रणरागिणींनी दाेन तास थांबवल्या एसटी

मुसळधार पाऊस, दाट धुके यातही भाविकांची पहाटे पासूनच दर्शनासाठी व पावसाळी पर्यटनासाठी भिमाशंकर परिसरात मोठी गर्दी झाली आहे. यावर्षी अधिक व श्रावण जोडून आल्याने शिवलिंगाचे दर्शन असा दिनक्रम महत्वाचा मानला जातो.

देशाच्या कानाकोपऱ्यातुन भाविक (devotees) भिमाशंकर चरणी दाखल होत आहेत. हर हर महादेव...ओम नमः शिवाय... म्हणत मोठ्या भक्तीभावाने भाविक आधिक मास यात्रा पुर्ण करताना पहायला मिळताहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com